महामार्गावर वेग वाढविल्याची किंमत ५० लाख! ३५ हजार चालकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:34 AM2021-09-13T04:34:27+5:302021-09-13T04:34:27+5:30
महामार्गावर वाहन वेगाने चालविण्यासाठी निर्बंध आहे. त्यानंतरही अनेक वाहनधारक अतिशय वेगाने वाहन चालवितात. यातून अपघात घडताे आणि अनेकांना जीव ...
महामार्गावर वाहन वेगाने चालविण्यासाठी निर्बंध आहे. त्यानंतरही अनेक वाहनधारक अतिशय वेगाने वाहन चालवितात. यातून अपघात घडताे आणि अनेकांना जीव गमवावा लागताे. या गंभीर प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी इंटरसेक्टर मशीन माेबाईल वाहनांना लावण्यात आली आहे.
महामार्ग वाहतूक शाखा महामार्गावर असे वाहन उभे करून अधिक वेगाने जाणाऱ्या गाडीचा वेग हेरतात. त्यांना थेट एसएमएस आणि दंडाची रक्कमही पाठविली जाते. वाहतुकीसाठीचे नियम ताेडणाऱ्यावर ही कारवाई हाेत आहे. या मशीनमुळे वाहनांचा वेग अचूक माेजता येताे.
धावत्या गाडीचा माेजला जाताे वेग
सुसाट वेगाने जाणारी वाहने इंटर सेक्टर मशीनमध्ये कॅच हाेतात. त्यावर गाडीचा नंबरही घेतला जाताे. अशा वाहनांना दंडाची पावती एसएमएसद्वारे पाठविली जात आहे. अशा वाहनांना चाप बसणार आहे.
एसएमएसवर मिळते पावती
हायवेवर ठिकठिकाणी पाेलिसांचे तळ आहे. यानंतर अतिवेगाने धावणारी वाहने थांबलेली नाहीत. महामार्गावर ८० च्या वर वेग वाढविणे गुन्हा आहे. अशा वाहनांना प्रतिबंध लावण्यासाठी दंडात्मक कारवाईची प्रक्रिया करण्यात येत आहे.