सामान्य ग्राहकाला घरगुती विजेचे ५० हजारांचे देयक
By Admin | Published: December 30, 2015 01:35 AM2015-12-30T01:35:33+5:302015-12-30T01:35:33+5:30
येथून २० कि.मी. अंतरावरील राजापूर येथे एका फुटपाथवर रोजीरोटी भागविणाऱ्या एका दुकानदाराला घरगुती वीज बिल महावितरण कंपनीने ...
कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : महावितरणचा सलग दुसऱ्यांदा शॉक
तुमसर : येथून २० कि.मी. अंतरावरील राजापूर येथे एका फुटपाथवर रोजीरोटी भागविणाऱ्या एका दुकानदाराला घरगुती वीज बिल महावितरण कंपनीने ५० हजार १७० रूपयांचे वीज देयक पाठविले आाहे. वीज बिल दुरुस्तीचा अर्ज तुमसरातील मुख्य कार्यालयात देऊनही सलग दुसऱ्यांदा तेवढ्याच रकमेचे बिल महावितरण कंपनीकडून देण्यात आले आहे. यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राजापूर येथे फुटपाथ दुकानदार नेतलाल भुरेलाल वाघमारे यांचे लहानसे घर आहे. घरची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. विजेचे तीन दिवे त्यांच्याकडे आहे. त्यांचा मीटर क्रमांक ७४०६१९७६५३ असा आहे. वाघमारे यांना मागील महिन्यात महावितरण कंपनीने ५० हजार रुपयांचे बील पाठविले होते. त्यामुळे वाघमारे यांनी तुमसर येथील मुख्य कार्यालयात वीज बिल दुरुस्तीकरिता रितसर अर्ज दिला. गोबरवाही येथील सहाय्यक अभियंत्यांनी मिटरची तपासणी व चौकशी केली. बिल जास्त आल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
सलग डिसेंबर महिन्यात पाठविलेल्या बिलात पुन्हा ५०,१७० रुपयांचा बिल देण्यात आला. या बिलात एकुण वीज युनिट वापर ७६ करण्यात आली. त्याचा बिल ४३३ रुपये ६९ पैसे बिल आकारणी करण्यात आली. परंतु मागील थकबाकी ५० हजार रूपये दाखविण्यात आली आहे. यामुळे वाघमारे यांना वीज कंपनीने पुन्हा शॉक दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)