चिचाळ येथे रंगला ५० मल्लांच्या कुस्तीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:12 PM2017-08-23T22:12:14+5:302017-08-23T22:12:47+5:30

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो.

50 wrestling wrestling thrills | चिचाळ येथे रंगला ५० मल्लांच्या कुस्तीचा थरार

चिचाळ येथे रंगला ५० मल्लांच्या कुस्तीचा थरार

Next
ठळक मुद्देविजयी मल्लांचा गौरव : केशव लेदे विजेता तर नामदेव शास्त्रकार उपविजेता

लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसºया दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ५० मल्लांनी सहभाग नोंदविला. कुस्तीच्या थरारचा आनंद ग्रामीणांनी मनमुराद लुटला. यात केशव लेदे हे विजेता ठरले तर नामदेव शास्त्रकार उपविजेता ठरले.
अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ हे गाव स्वातंत्र्य सैनिकाचे गाव आहे. या गावात जैराम दिघोरे, देवराव वाघधरे, ढेकल डहारे, दिवारु वाघधरे आदी पहेलवानांनी १९७६ पासून गावात आखाडा भरण्याची परंपरा सुरू केली होती. ती आजतागायत जोपासली जात आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षाला अहिल्यादेवी होळकर बाजार चौक येथे आखाड्याचे आयोजन अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. अतिथी म्हणून जयराम दिघोरे, दिवारू वाघधरे, देवराव वाघधरे, शंकर मांडवकार, रामकृष्ण वैरागडे, बिरशिराम भुरे, तुकेश वैरागडे, श्रीकृष्ण काटेखाये, वासुदेव लेंडे, यशवंत लोहकर, कलीम शेख, चिंकू सलूजा, सरपंच उषा काटेखाये, पं.स. सदस्य मंगला रामटेके आदी उपस्थित होते. या आखाड्यात पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला होता. विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम अ‍ॅड. देवीदास वैरागडे व परसराम दिघोरे यांचेकडून देऊन गौरविण्यात आले. मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मागील ४० वर्षांपासून ही परंपरा कायम राखल्याने अनेकांना हे सांस्कृतिक पर्वणीच असल्याचे वाटते. प्रथम, द्वितीय मल्लांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात आले. जिल्ह्यातील मल्लप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. पंच म्हणून ईश्वर वैद्य, देवराव वाघधरे,बिरशीराम भुरे, जयराम दिघोरे यांनी केले. या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
जि.प. शाळेचे शिक्षक ठरले विजेता
कुस्तीच्या दंगलमध्ये चिचाळ येथे ५० पट्टीच्या मल्लांनी सहभाग घेतला. यात चिचाळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या केशव लेदे यांनीही सहभाग घेतला. लेदे यांनी मुस्तीच्या आखाड्यात उतरल्यानंतर प्रथमत: ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, शिक्षक लेदे यांनी अनेकदा आखाडे गाजविले हे अनेकांनी माहित नव्हते. बघता बघता शिक्षक लेदे कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहचले आणि शेवटचा आखाडा सुरू झाला. अंतिम सामन्यात लेदे यांच्याची झुंज नागपूर येथील नामदेव शास्त्रकार यांच्याशी होती. यात लेदे यांनी शास्त्रकार यांच्यावर लिलया मात करून कुस्तीचा आखाडा जिंकला.

Web Title: 50 wrestling wrestling thrills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.