साकोली येथे आरोग्य शिबिरात ५०० रुग्णांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:37 AM2021-09-11T04:37:01+5:302021-09-11T04:37:01+5:30
शिबिरात डोळ्यांची तपासणी, रक्तदाब व इतर आरोग्य मार्गदर्शन महात्मे नेत्रपेढी चमूचे डॉ. पलक मंत्री, डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. अरविंद ...
शिबिरात डोळ्यांची तपासणी, रक्तदाब व इतर आरोग्य मार्गदर्शन महात्मे नेत्रपेढी चमूचे डॉ. पलक मंत्री, डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ. शकुंतला कापगते, संचिता राऊत, स्वप्निल लिमजे आदींनी आरोग्यसेवा दिली. शिबिरात प्रमुख उपास्थिती नगरपरिषद उपाध्यक्ष जगनराव उईके, दुलिचंद कोसलकर यांची होती. विशेष म्हणजे शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानवतीने आतापर्यंत नेत्रशिबिरे ८०, मरणोत्तर नेत्रदान २७ जण, तीन हजार चष्मे वाटप व २०५५ नेत्र, मोतीबिंदू व आदी शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. संचालन नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी केले. शिबिरासाठी मोरेश्वर गहाणे, राजू कापगते, भागवत लांजेवार, मधुकर नगरकर, ताजराम बोंबार्डे, आशिष चेडगे, डी. जी. रंगारी, जागेश्वर संग्रामे, आशिष सेलोकर, प्रतीक मेडिकलचे बलराज नंदेश्वर, गणेश सूर्यवंशी, मिन्नाथ लांजेवार आदींनी प्रयत्न केले.