५.१७ लाख रूपयांची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:57 PM2018-04-13T22:57:51+5:302018-04-13T22:57:51+5:30
लाखांदूरमार्गे गडचिरोली जिल्ह्यात देशी व विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या एका चारचाकी वाहनाला लाखांदूर पोलिसांनी शुक्रवारला सकाळी पकडले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या वाहनात ४५ पेट्या दारू आढळून आले असून वाहनासह ५.१७ लाख रूपयाची कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : लाखांदूरमार्गे गडचिरोली जिल्ह्यात देशी व विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या एका चारचाकी वाहनाला लाखांदूर पोलिसांनी शुक्रवारला सकाळी पकडले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या वाहनात ४५ पेट्या दारू आढळून आले असून वाहनासह ५.१७ लाख रूपयाची कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी वैभव प्रकाश बनकर (२५), शेख हैदर शेख (२४) रा.वडसा या दोघांना अटक करण्यात आली आहे. लाखांदूर तालुक्यातील दारू व्यवसायिक हे गडचिरोली व चंद्रपूर या दारूबंदी जिल्ह्यात दारूची अवैध विक्री करीत आहेत. पवनी तालुक्यातून लाखांदूरमार्गे दारूचा पुरवठा हा होत असल्याची माहिती होताच लाखांदूर पोलिसांनी पाळत ठेऊन ही कारवाई केली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास चुलबंद नदीच्या पुलावर दारू वाहून नेणाºया चारचाकी वाहनाला पकडण्यात आले. त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता देशी व विदेशी दारूच्या ४५ पेट्या दारू आढळून आले. या कारवाईत १ लाख १७ हजार रूपयांची दारू व चारचाकी वाहन (क्र.एमएच ३१ सीपी ९४१३) चार लाख असे मिळून ५.१७ लाख रूपयाची कारवाई करण्यात आली. २ एप्रिल रोजी दुचाकीने दारू वाहून नेताना ३२ हजार २८८ रूपयांची दारू पकडली होती. यातील राजू कोतरांगे याला अटक केली होती. ६ एप्रिलला कार (क्र.एमएच ३२ सी १३८८) ने दारू वाहून नेताना पकडण्यात आले होते. मुद्देमालासह १.१३ लाख रूपयांची कारवाई करून नरेश गभने याला अटक करण्यात आली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनात विष्णू खंडाते, राजू पंचबुध्दे, अमितेशकुमार वडेटवर, उमेश वलके, सचिन कापगते, नितीन बोरकर, लोकेश ढोक, राजेश शिंदे यांनी कारवाई केली.