वर्षभरात वरठी ठाण्याच्या हद्दीत ५३ आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:45 PM2018-10-11T21:45:30+5:302018-10-11T21:45:50+5:30
सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यातून गरीब-श्रीमंत असा भेदभाव उरला नाही. यात शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींची संख्या अधिक आहे. वर्षभरात वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या आत्महत्यामुळे कुटुंबाना नानाविध समस्यांसह अनेक प्रश्नांना समोर जावे लागते.
तथागत मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यातून गरीब-श्रीमंत असा भेदभाव उरला नाही. यात शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींची संख्या अधिक आहे. वर्षभरात वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या आत्महत्यामुळे कुटुंबाना नानाविध समस्यांसह अनेक प्रश्नांना समोर जावे लागते.
घरातील महत्वाचा व्यक्ती गेल्याच्या दु:खात असेलेल्यांना येणारी आवाहने ही मृत्यूपेक्षा भयानक ठरत आहेत. आत्महत्या केल्याने मृतकाचे सुटका होत असली तरी कुटुंबाच्या मागे असह्य दु:ख वाट्याला येताना दिसतात. घरातील तरुण मुलगा किंवा मुलगी अचानक गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात.
त्यातल्या-त्यात सुरु होणाऱ्या विविध चर्चा दु:ख वाढवल्या खेरीज काहीच करीत नाही. कधी कधी तर आपणही आत्महत्या करून मोकळे होऊन जावे अशी परिस्थिती निर्माण होते. स्वत:ला संपणे आणि मुक्त होणे यातून घडणाºया घटना आपल्या मागे अनेक आवाहने सोडून जातात. आत्महत्या म्हणजे गुन्हा आहे. आत्महत्या बाबत पोलीस प्रशासनाची प्रश्नांची सरबत्ती व शोध म्हंणजे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आहे. त्यांचे समाधान होईस्तोवर उत्तरे देणे म्हणजे आवाहनच ठरते. यात त्याचा दोष आहे असा नाही. हा त्याचा तपासाचा भागच आहे. पण एका आत्महत्येनंतर त्याच्या मागे असलेले अख्खे कुटुंब याला समोर जाते. त्यातल्यात्यात समाजाची पाहण्याचा दृष्टिकोन गुन्हेगार सारखा असतो. अनेक जण यावर तोंडसुख घेताना कर्माची फळ व पाप-पुण्य यापलीकडे जाऊन चर्चा रंगवतात . या सर्व घडामोडी म्हणजे एकप्रकारची शिक्षा ठरत आहेत.
वरठी सारख्या लहानशा गावात वर्षभरात ५३ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक शालेय मुले- मुलींची आहे. ही बाब एका गावापुरती नाही. सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. या सर्व बाबीसाठी नेहमी पालकांना वेठीस धरले जाते. खरंच एखाद्या पालकाला वाटते की त्याच्या मुलाने आत्महत्या करावी म्हणून? याबाबत आपणच आपल्याला प्रश्न विचारायची गरज आहे. मोठ्या प्रमाणात होणाºया आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभारणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातून यावर जागरण होणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येक घरी एक आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही.
मुलांशी संवाद निष्फळ
अंगावर खेळणारी मूल वयात आल्यावर आपोआप अंतर तयार करतात. लहान-लहान गोष्टी कुतूहलाने सांगणारी ही मूल नकळत आपल्याशी दुरावतात. त्यांच्या आयुष्यात घडणाºया गोष्टी व घटना शेअर करण्यासाठी 'सेफ झोन' निवडतात. यासाठी समवयस्क मित्र शोधून ठेवतात. यामुळे आपली इच्छा असूनही त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. यामुळे कितीही प्रयत्न करून त्यांच्या मनातील जाळे उलगडत नाहीत. ते आपल्याला नेमकं तेवढ्याच गोष्टी शेयर करतात जे त्यांना करावसा वाटतात. यासाठी आपल्याकडे अनेक उपाय सांगणारे आहेत. मुलाशी संवाद हा त्यापैकी एक पण वयात येणारी मुले मुली पालकांपासून अंतर ठेवायला लागल्याने संवादाची संकल्पना उपायकारक ठरत नाही.
मोबाईल व मित्र ठरताहेत घातक
सध्याच्या युगात मोबाईल व मित्र सर्वाधिक घातक शस्त्र ठरत आहेत. आताची पिढी आक्रमक असून संवेदशील आहे. एखाद्या घटनेवर तत्काळ निर्णयाची प्रवृत्ती धोकादायक ठरत आहे. या सर्व परिस्थितीला मोबाइल व मित्र कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईल मुळे जग जवळ आले. त्यातल्या त्यात केव्हाही व कुठेही संपर्क करण्याची फास्टेस्ट पद्धत सुरु झाली. अशा प्रथेमुळे तात्काळ जाब विचारणे आणि समाधान न झाल्यास टोकाची भूमिका घेऊन स्वत:ला संपवणे सोपं झाले आहे. यामुळे पालकांनी मोबाईल व मित्र याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. सुख साधने असावी पण त्याचा केव्हा व कशासाठी होतो, यावर पाळत ठेवणे आवश्यक आहे.