हिरकणी उद्योगच्या नावाखाली ५३०० महिलांना ३२ लाख ८६ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 02:11 PM2022-09-29T14:11:40+5:302022-09-29T14:19:23+5:30

चाैघांवर गुन्हा दाखल : प्रत्येक महिलेकडून घेतले ६२० रुपये

5300 women cheated of 32 lakhs 86 thousand in the name of Hirkani Udyog | हिरकणी उद्योगच्या नावाखाली ५३०० महिलांना ३२ लाख ८६ हजारांचा गंडा

हिरकणी उद्योगच्या नावाखाली ५३०० महिलांना ३२ लाख ८६ हजारांचा गंडा

Next

भंडारा : हिरकणी उद्योगाच्या नावाखाली जिल्ह्यातील तब्बल ५३०० महिलांना ३२ लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कंपनी संचालकांसह चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली समन्वयकांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेकडून ६२० रुपये गोळा करून हा गंडा घातला.

संचालक सोनिका गाडेकर (५५, रा. जलमंदिराशेजारी फलटण, जि. सातारा) कंपनी चेअरपर्सन दीपक चव्हाण (४०), विदर्भ प्रमुख प्रियंका कोकाटे (३०, रा. गांधीनगर बीड) आणि पल्लवी खोब्रागडे (२५, रा. लाखोरी रोड, लाखनी, जि. भंडारा) अशी आरोपींची नावे आहे. भंडारा शहरालगतच्या फुलमोगरा अशोकनगर येथील मनिषा भागवत मेश्राम यांना त्यांची मैत्रीण लोकप्रिया देशभ्रतार हिने इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफार्म, व्हाॅटस् ॲपवर एक लिंक पाठविली. त्याला हिरकणी व्यवसाय प्रशिक्षण व महिला उद्याेग समूह महाराष्ट्र राज्याची असेल असे समजून मनिषा त्यात सहभागी झाली.

ऑगस्ट २०२१ मध्ये या चाैघांनी भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात समन्वयक पदाच्या मुलाखतीसाठी आमंत्रित केले. १२ हजार रुपये वेतन व तीन हजार रुपये प्रवासभत्ता देण्याचे ठरले. यावेळी २२ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना महिला उद्योग समूहांना जोडण्याचे काम दिले. मनिषाने यादरम्यान ८५ महिलांना उद्योग समूहात जोडत प्रत्येकीकडून ६२० रुपये प्रशिक्षण शुल्क घेतले. ते ५२ हजार ७०० रुपये कंपनीच्या फोन पे आणि बँक खात्यात जमा केले. याचप्रमाणे इतर २१ समन्वयकांनीही महिलांकडून ६२० रुपये गोळा केले. त्यात तब्बल पाच हजार ३०० महिला सहभागी झाल्या. सर्व पैसे ३२ लाख ८६ हजार रुपये संबंधितांना पाठविण्यात आले.

परंतु काही दिवसांनंतर कोणत्याही महिलेला प्रशिक्षण आणि सामग्रीही उपलब्ध करून दिली नाही. त्यावेळी या महिला समन्वयकांना भेटून साहित्याची मागणी करत होत्या. त्यावरून या समन्वयकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी टोलवाटोलवी केली. त्यानंतर दिलेला धनादेशही अनाधरीत झाला शेवटी मनिषा मेश्राम यांनी भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून भादंवि ४२०, ३४, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९१ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास भंडाराचे ठाणेदार सुभाष बारसे करत आहे.

लिंकने केला घात

मनिषा मेश्राम यांना त्यांच्या मैत्रिनीने व्हॉट्सअॅपवर हि लिंग पाठविली. ती लिंक राज्य शासनाची असल्याचे समजून ती त्यात सहभागी झाली. दरम्यान, हिरकणी कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना आमिष देत समूहात सहभागी केले आणि त्यातूनच त्यांच्यासोबत इतर महिलांचीही फसवणूक झाली.

Web Title: 5300 women cheated of 32 lakhs 86 thousand in the name of Hirkani Udyog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.