सिल्ली येथे ५३८ जणांनी घेतला नेत्र तपासणी शिबिराचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:33+5:302021-02-27T04:47:33+5:30
शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिया पटेल, धनंजय तिरपुडे, सरपंच ...
शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिया पटेल, धनंजय तिरपुडे, सरपंच निर्भय क्षीरसागर, प्रसन्ना चकोले, पद्माकर डुंबरे, ग्रामपंचायत सदस्य लोकेश मेश्राम, सदस्या निराशा गजभिये, विनीत देशपांडे, जागेश्वर बडगे, सचिन हिंगे, मोहन देशमुख, डॉ. योगेश जिभकाटे आदी उपस्थित होते.
सदर नेत्र तपासणी शिबिराचा सिल्ली परिसरातील ५३८ नागरिकांनी लाभ घेतला. इंद्रक्षी आय केअर भंडारा यांच्या वतीने या शिबिरात एकूण ५३८ लोकांनी तपासणी केली. यात १७८ लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू झालेल्या १०६ गरजूंवर रविवारला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना मोफत चष्मे मिळाल्याने व मोतीबिंदू झालेल्या गरजूंवर शस्त्रक्रिया होणार असल्याने सिल्ली ग्रामवासीयांनी प्रसन्ना चकोले यांचे आभार मानले. या नेत्र तपासणी शिबिरात इंद्राक्षी आय केअरचे डॉ. योगेश जिभकाटे, डॉ. विशाखा जिभकाटे, प्रणय चिमनकर व प्रज्वल बारेवार, तसेच त्यांच्या चमूने नेत्र तपासणीसाठी सहकार्य केले.