५५ प्रवासी थोडक्यात बचावले
By admin | Published: September 19, 2015 12:34 AM2015-09-19T00:34:39+5:302015-09-19T00:34:39+5:30
रस्त्यावरुन धावणाऱ्या बसचे अचानक सॉफ्टींग बुश तुटल्यामुळे धावती बस रस्त्यावर उभी झाली.
नेरी-भोसा मार्गावरील घटना : चालकांच्या समयसूचकतेने टळला अनर्थ
वरठी : रस्त्यावरुन धावणाऱ्या बसचे अचानक सॉफ्टींग बुश तुटल्यामुळे धावती बस रस्त्यावर उभी झाली. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. चालकाचे नियंत्रण सुटले असते तर रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफार्मवर बस आदळली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. सदर घटना नेरी-भोसा मार्गावरील नेरीजवळ शुक्रवारला सकाळी ७ वाजता घडली.
भंडारा आगाराची एमएच४०/ एन.९२४९ ही बस भंडारामार्गे हिवरा येथून परतीच्या प्रवासादरम्यान नेरी मार्गावर या बसचे अचानक सॉफ्टींग बुश तुटले.
ही बाब डी.डी. भोयर या चालकाच्या व आर. एन. घाटबांधे या वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी बसवर नियंत्रण मिळवित बस थांबविली. यावेळी बसमध्ये ५५ प्रवासी बसले होते. अचानक अपघातजन्यस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशी घाबरले होते. (वार्ताहर)