५५ दुकानदार आणि ७५५ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:41+5:302021-04-20T04:36:41+5:30
शहरात दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आपत्ती व्यवस्थापन विभागाने निर्धारित करून दिली आहे; मात्र त्यानंतरही अनेक जण आपली ...
शहरात दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आपत्ती व्यवस्थापन विभागाने निर्धारित करून दिली आहे; मात्र त्यानंतरही अनेक जण आपली दुकाने, आस्थापना उघडी ठेवत असल्याचे दिसत आहे. अशा भंडारा शहरातील ५५ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नगरपरिषदेने यासाठी विशेष पथक तयार केले असून शहराच्या विविध भागात जाऊन पथक कारवाई करीत आहे.
बॉक्स
विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कडक कारवाई
कोणतेही काम नसताना भंडारा शहरात फिरणाऱ्या व्यक्तीवर आता नगरपरिषदेने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधी अशी कारणे सांगून बाहेर निघत आहेत. तासन्तास शहरात भटकतात. या मंडळींना आवर घालण्यासाठी नगरपरिषदेने आता मोहीम सुरू केली आहे. दंडात्मक कारवाई, सोबतच फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.