५.५० लाखांचा दारुसाठा जप्त

By Admin | Published: April 7, 2017 12:32 AM2017-04-07T00:32:36+5:302017-04-07T00:32:36+5:30

देशी विदेशी दारुची साठवणूक करून त्याची अवैधरित्या विक्री केली जात होती. याप्रकरणी मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक

5.50 lakhs of liquor seized | ५.५० लाखांचा दारुसाठा जप्त

५.५० लाखांचा दारुसाठा जप्त

googlenewsNext

दोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची साकोलीत कारवाई
भंडारा : देशी विदेशी दारुची साठवणूक करून त्याची अवैधरित्या विक्री केली जात होती. याप्रकरणी मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालून ५.५० लाखांचा दारु साठा जप्त करून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई साकोली येथे करण्यात आली.
उत्तम रामय्या गोडसेलवार (६५) व संतोष व्यंकट आसमगारी (३५) या दोघांना दारु साठ्यासह पोलिसांनी अटक केली. येथील एकोडी रोडवरील टोली वॉर्डात उत्तम गोडसेलवार यांच्या मालकीच्या घरी मागील काही दिवसांपासून देशी विदेशी दारुची साठवणूक करून विक्री करण्यात येत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली.
या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या पथकाने साकोली येथील गोडसेलवार यांच्या घरी बुधवारला छापा घातला. यावेळी उत्तम गोडसेलवार व संतोष आसमगारी यांना दारु साठ्यासह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रिझवी, विनोद रहांगडाले, पोलीस हवालदार वामन ठाकरे, बंडू नंदनवार, माणिक साकुरे, वैभव चामट, स्नेहल गजभिये, रामटेके आदींनी केली. (शहर प्रतिनिधी)

२८३ लिटर दारु जप्त
आरोपींकडून ५७ हजार २०० रुपयांची २१०.१८० लिटर देशी दारु, ४२ हजार ७७९ रुपयांची ७२.३४५ लिटर विदेशी दारु अशी ९९ हजार ९६९ रुपयांची २८२.५२५ लिटर देशी विदेशी दारु साठा जप्त केला. सोबतच ही दारु वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे चार चाकी वाहन असा एकुण ५ लाख ४९ हजार ९६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: 5.50 lakhs of liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.