कसलं भारी राव; महाराष्ट्रातल्या अभयारण्यातील सहा वाघ एकत्र पाहून म्हणाल Wowww!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 10:09 AM2022-06-13T10:09:50+5:302022-06-17T21:32:49+5:30
अलीकडे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य वाघ्र दर्शनासाठी प्रसिद्धीस येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच वेळी सहा वाघांचे दर्शन होत आहे.
अशोक पारधी
पवनी (भंडारा) : अभयारण्यात गेल्यावर वाघाचे दर्शन हाेईलच, याची खात्री नसते. अनेक पर्यटकांना निराश हाेऊनही अभयारण्यातून आल्या पावली परतावे लागते. दाेनदा-तीनदा अभयारण्यात सफारी केली तरी जंगलाच्या राजाचे दर्शन हाेत नाही. असे असताना एक, दाेन, तीन नव्हे तर चक्क सहा वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले. असा हा दुर्मिळ याेगायाेग उमरेड - पवनी - कऱ्हांडला अभयारण्यात शनिवारी जुळून आला. सहा वाघ दिसण्याचा हा ‘याेग’ व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला असून ताे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल हाेत आहे. त्यामुळे आता पवनी गेटवर पर्यटकांची मोठी गर्दी वाढत आहे.
पवनी (भंडारा)- अभयारण्यात गेल्यावर वाघाचे दर्शन हाेईलच, याची खात्री नसते. दाेनदा-तीनदा अभयारण्यात सफारी केली तरी जंगलाच्या राजाचे दर्शन हाेत नाही. असे असताना एक, दाेन, तीन नव्हे तर चक्क सहा वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले. pic.twitter.com/cZafOIOQZU
— Lokmat (@lokmat) June 13, 2022
अलीकडे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य वाघ्र दर्शनासाठी प्रसिद्धीस येत आहे. भंडारा जिल्ह्यात समृद्ध वनसंपदा असून, नवेगाव - नागझिरा, कोका आणि उमरेड - पवनी - कऱ्हांडला अशी तीन अभयारण्य आहेत. जैवविविधतेसाठी प्रसिद्ध या अभयारण्यांत मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा संचार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी गेटमधून प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघांचे दर्शन होते. त्यामुळे येथे पर्यटकांची कायम गर्दी असते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच वेळी सहा वाघांचे दर्शन होत आहे. शनिवारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना प्रसिद्ध शॅडो वाघिणीसह तिचे तीन बछडे आणि अन्य दोन वाघांचे दर्शन झाले. त्यांनी वाघांचा मुक्त संचार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अभयारण्य पावसाळ्यात बंद होत असल्याने त्यापूर्वी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत.
ही पहिलीच वेळ
उमरेड - पवनी - कऱ्हांडला अभयारण्यात एकाच वेळी सहा वाघांच्या दर्शनाचा अभूतपूर्व योग शनिवारी पर्यटकांना अनुभवता आला. यापूर्वी या अभयारण्यात एकाच वेळी तीन वाघांचे दर्शन गत महिन्यात झाले होते. शॅडो वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचे दर्शन अनेकदा झाले होते. मात्र, एकाच वेळी सहा वाघ दिसण्याची या अभयारण्यातील ही पहिलीच वेळ आहे.