जिल्ह्यात ६१ पॉझिटिव्ह, भंडारात वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:51+5:302021-03-13T05:03:51+5:30
जिल्ह्यात गुरूवारी १२०७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा ३६, साकोली नऊ, मोहाडी पाच, लाखनी तीन आणि तुमसर ...
जिल्ह्यात गुरूवारी १२०७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा ३६, साकोली नऊ, मोहाडी पाच, लाखनी तीन आणि तुमसर व पवनी येथे प्रत्येकी चार असे ६१ रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १४ हजार ११८ झाली आहे. त्यापैकी १३ हजार ३७३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर ३२८ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ४१७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात ५९८४ आढळून आले. तर मोहाडीत १०९५, तुमसर १८०४, पवनी १३१५, लाखनी १५३०, साकोली १७३१ आणि लाखांदूर तालुक्यात ६५९ रुग्ण आढळून आले आहेत. गत १५ दिवसानंतर गुरूवारी कोरोनाने मृत्यूची नोंद झाली. भंडारा तालुक्यातील एक ६० वर्षीय महिला कोरोनाने मृत्यूमुखी पडली.
जिल्ह्यात ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णात भंडारा २५५, मोहाडी १८, तुमसर ५५, पवनी २५, लाखनी ३६, साकोली २२ आणि लाखांदूर तालुक्यात सहा असे ४१७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. कोरोना लसीकरण सुरू असून नागरिकांनी रुग्णालयात गर्दी टाळण्यासाठी ई संजीवनी ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.