६.२३ कोेटींचे चुकारे अडले

By admin | Published: April 4, 2016 01:04 AM2016-04-04T01:04:48+5:302016-04-04T01:04:48+5:30

खरीप हंगामात धान उत्पादनात घट झाली आहे. यावर्षांत जिल्ह्यातील ५७ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १७,३४६

6.23 cottburns bent | ६.२३ कोेटींचे चुकारे अडले

६.२३ कोेटींचे चुकारे अडले

Next

देवानंद नंदेश्वर ल्ल भंडारा
खरीप हंगामात धान उत्पादनात घट झाली आहे. यावर्षांत जिल्ह्यातील ५७ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १७,३४६ शेतकऱ्यांकडून एकूण ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ या धानाची किंमत ८७ कोटी ०४ लाख ८६ हजार ६० रूपये एवढी आहे. यासह शेतकऱ्यांना प्रती क्विटल २०० रुपये बोनसप्रमाणे १२ कोटी ३४ लाख ७३ हजार २०० रुपयांचे वाटप होत आहेत. ३१ मार्चपर्यत शेतकऱ्यांना धान खरेदी व बोनस मिळून एकूण ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांचे चुकारे वाटप करण्यात आले आहे. अद्यापही ६ कोटी २३ लाख ३ हजार १५ रुपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे अडले आहे.
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला होता़ निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिक उत्पादनात घट झाली. यावर्षी सुरुवातीला धान खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागले. विविध संघटनांच्या आक्रमक भूमिकांमुळे जिल्ह्यात एकुण ५७ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. उच्च प्रतिच्या धानाला प्रती क्विंटल १,४६० रूपये तर, साधारण प्रतिच्या धानाला १,४१० रुपये आधारभूत किंमत देण्यात आली. १ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़
यात भंडारा तालुक्यात ११ हजार ५४३.५५, मोहाडी तालुक्यात ३० हजार ६८३.२५, तुमसर तालुक्यात १ लाख २२ हजार ८९५.७०, लाखनी तालुक्यात १ लाख २३ हजार ९९६.२०, साकोली तालुक्यात ९७ हजार २०९.८०, लाखांदूर तालुक्यात १ लाख ५७ हजार ७७३.२० तर, पवनी तालुक्यात ७३ हजार ६४.६० क्विंटलचा समावेश आहे.

८७.०४ कोटींची धान खरेदी
४जिल्ह्यात ८७ कोटी ४ लाख ८६ हजार ६० रुपयांची धान खरेदी करण्यात आली़ जिल्ह्यात अ ग्रेड धानाची खरेदी झालेली नाही. साधारण धानाची ६ लाख १७ हजार ३६६ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १७,३४६ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपयांप्रमाणे १२ कोटी ३४ लाख ७३ हजार २०० रुपयांची वाटप प्रक्रीया सुरु आहे. धान खरेदी व बोनस मिळून ९९ कोटी ३९ लाख ५९ हजार रुपयांच्या रक्कमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेमध्ये ९६ कोटी २३ लाख ८३ हजार १६७ रुपयांची हुंडी दाखल करण्यात आली. शेतकऱ्यांना धान व बोनसचा मोबदला म्हणून ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली़ ६ कोटी २३ लाख ३ हजार १५ रुपयांचे चुकारे अद्यापही अडले आहेत.

धान खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. १७,३४६ शेतकऱ्यांना धान व बोनसचा मोबदला म्हणून ९३ कोटी १० लाख ५६ हजार १९५ रुपयांची रक्कम वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ६.२३ कोटी रुपयांच्या रक्कमेचे लवकरच वाटप होईल.
- चंद्रकांत खाडे,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.

Web Title: 6.23 cottburns bent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.