सहा महिन्यांत ६.५ कोटींची कामे

By admin | Published: October 29, 2016 12:31 AM2016-10-29T00:31:35+5:302016-10-29T03:22:06+5:30

पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे...

6.5 crore works in six months | सहा महिन्यांत ६.५ कोटींची कामे

सहा महिन्यांत ६.५ कोटींची कामे

Next

जलयुक्त शिवार अभियान : यावर्षी केली ५९ गावांची निवड
इंद्रपाल कटकवार भंडारा
पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात २९२ कामे पुर्ण झाली असून त्यावर सहा कोटी ५२ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्रजीवन करणे, भुजल अधिनियम अंमलबजावणी करणे, जलस्त्रोतातील गाळ उपसून पाणीसाठा वाढविणे, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच लोकसहभाग वाढवून जनजागृती करणे असे विविध उद्देशातून जलयुक्त शिवार अभियान मागील वर्षीपासून राबविण्यात येत आहे. यात एप्रिल २०१६ ते आॅक्टोबर महिन्यापर्यंत भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात हाती घेण्यात आलेल्या एकूण कामांपैकी २९२ कामे पुर्ण झाली असून त्यावर सहा कोटी ५२ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत भंडारा तालुक्यातील चोवा, रावणवाडी, खुटसावरी, गुंथारा, सालेहेटी, टेकेपार, कोका, सर्पेवाडा, दुधाळा, राजेदहेगाव. मोहाडी तालुक्यातील महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव, धोप, ताळगाव, जांब. तुमसर तालुक्यातील हिंगणा, मिटेवानी, झारली, येदरबुची, राजापूर, लोभी, सौदेपुर, सोनेगाव, देव्हाडी, सुकळी तर पवनी तालुक्यातील तांबेखानी, रेंगेपार, ब्रम्ही, निलज, भुयार, आमगाव, कातुर्ली, धानोरी, शेलारी या गावांचा समावेश आहे.
याशिवाय लाखनी तालुक्यातील नऊ, साकोली तालुक्यातील सहा तर लाखांदूर तालुक्यातील झरी, पारडी, तिरखुरी, दिघोरी, पेंढरी (सोनेगाव) या गावांची निवड करण्यात आली आहे.
या गावांमध्ये मागील सहा महिन्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बोडी निर्माण करणे, तलावातली गाळ उपसणे, पाणी पुरवठ्याची उपलब्धतता करणे आदी कामे करण्यात आली आहे.

मागीलवर्षी झाली १ हजार २४ कामे
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागीलवर्षी म्हणजे सन २०१५-१६ मध्ये एक हजार २४ कामे पूर्ण करण्यात आली आहे. या कामासाठी एकूण २८ कोटी ७१ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून तालुकानिहाय ८६ गावांची निवड करण्यात आली होती. सर्व यंत्रणा मिळून ही कामे यशस्वीपणे पुर्ण करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील गराडा (बु.), गराडा (खु.), सिल्ली, मानेगाव, मकरधोकडा, नवरगाव, ईटगाव, गोलेवाडी, माटोरा, खमारी, पलाडी, मंडनगाव, कवलेवाडा, माडगी, खुर्शीपार या गावाचा समावेश करण्यात आला होता. तसेच तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी तालुक्यातील १५, पवनी तालुक्यातील १२, साकोली तालुक्यातील ११, लाखनी तालुक्यातील नऊ तर लाखांदूर तालुक्यातील सहा गावांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली होती.

Web Title: 6.5 crore works in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.