६.८० लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:56 PM2018-04-16T22:56:43+5:302018-04-16T22:57:04+5:30

चंद्रपूर या दारूबंदी जिल्ह्यात दारूची अवैध तस्करी करताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६.८० लाख रूपयांची दारू वाहनासह पकडली. ही कारवाई पवनी तालुक्यात करण्यात आली.

6.80 lakhs liquor seized with liquor | ६.८० लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त

६.८० लाख रूपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देपवनी येथे वाहन पकडले : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चंद्रपूर या दारूबंदी जिल्ह्यात दारूची अवैध तस्करी करताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ६.८० लाख रूपयांची दारू वाहनासह पकडली. ही कारवाई पवनी तालुक्यात करण्यात आली.
गोपणीय माहितीच्या आधावर पाळत ठेऊन असलेल्या या पथकाला पवनी तालुक्यात चारचाकी (क्र.एम.एच. ४०/एस.आर. ९०११) हे वाहन दिसले. त्यांनी या वाहनाला थांबविण्याचा ईशारा केला असता वाहनचालकने वाहनाचा वेग वाढवून वाहन पळवून नेले. त्यानंतर या वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले.
त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता त्यात ५० खरडयाच्या पेट्यांमध्ये देशी दारूच्या ५० मिली व ९० मिलीच्या ५ हजार सीलबंद शिशा आढळून आले. वाहनासह ६.८० लाख रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी अंकुश रमेश शेंडे रा.बाम्हणी, ता.नागभीड जि.चंद्रपूर याला अटक करण्यात आली. पवनी तालुक्याला दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून असल्यामुळे हा देशी दारूचा साठा चंद्रपूर जिल्ह्यात जात असावा, असा प्राथमिक अंदाज असल्याचे पथकाने सांगितले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त उषा वर्मा व अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक साकोलीचे निरिक्षक ब्रिजलाल पटले, प्रभारी निरिक्षक संतोष मेहकरकर, सहाय्यक दुय्यम निरिक्षक विनोद सोनलवार, किशोर बिरणवारे, राकेश राऊत, रविंद्र बावनकुळे, मंगेश ढेंगे, राजू श्रीरंग यांनी केली असून तपास निरिक्षक ब्रिजलाल पटले हे करीत आहेत.

Web Title: 6.80 lakhs liquor seized with liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.