७० गावांना मिळणार २६ कोटींची नुकसानभरपाई

By admin | Published: July 5, 2017 12:57 AM2017-07-05T00:57:45+5:302017-07-05T00:57:45+5:30

शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही.

70 crore compensation for 26 crores | ७० गावांना मिळणार २६ कोटींची नुकसानभरपाई

७० गावांना मिळणार २६ कोटींची नुकसानभरपाई

Next

२०१५ च्या खरीप हंगामातील नुकसान : विभागीय आयुक्तांनी मागितला अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही. दोन वर्षानंतर प्रशासन आता जागे झाले असून खरीप २०१५ ची नुकसान भरपाई मिळण्याचे संकेत मिळाले आहे. किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल याची माहिती नागपूर विभागीय आयुक्तांनी मागितली आहे.
तहसील कार्यालयाकडून माहिती गेली असून दोन वर्षानंतर नुकसानभरपाई मिळण्याची आशा बळावली आहे. २०१५ च्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली होती. ती गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. यात भंडारा तालुक्यातील चार गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, लाखांदूर ८९ गावे, लाखनी १०२ अशी ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली होती.
मोहाडी तालुक्यातील सिंचनाखाली पिकांच्या क्षेत्राखाली येणारे २२,६७९ शेतकरी तसेच कोरडवाहू पिकाखाली क्षेत्राखाली येणारे ११९२ शेतकरी अशा २३ हजार ८५१ शेतकऱ्यांना २५ कोटी ९६ लक्ष ६७ हजार रुपये दिले जाणार आहे. तहसीलदार यांनी नुकसान भरपाईकरिता तेवढ्या आवश्यक निधीची मागणी रक्कम जिल्हाधिकारी भंडारा यांना कळविली आहे.
खरीप हंगाम २०१५ मध्ये ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या गावामध्ये हिवरा, नवेगाव, रिठी, बच्छेरा, पांजराग्राम, कांद्री, बोथली रिठी, देऊळगाव, बिटेखारी, जांब, धुसाळा, बोंदरी, घोरपड, नवेगाव, खैरलांजी, काटी, धोप, ताडगाव, सिहरी, सकरला, मलदा, आंधळगाव, चिचोली, अकोला, सालई खुर्द, नेरला, रिठी, पालडोंगरी, उसर्रा, डाकला, काटेबाम्हणी, सालई बु., विहिरगाव, यंदा, भिकारखेडा, धर्मापूरी, डोंगरगाव, महालगाव, घाटकुरोडा, पांजरा, बोथली, माहेगाव, रोहणा, दहेगाव, देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा खु., निलज बु., जांभळापाणी, मोहगाव, उसरीपार, दवडीपार, ठाणेगाव, निलज खुर्द, मुंढरी, खु., मुंढरी, बु., कान्हळगाव, ढिवरवाडा, करडी, एकलाझरी, जांभोरा, किसनपूर, बोरी, पांजरा, पांजरा, खडकी, डोंगरदेव, बोंडे, पालोरा, केसलवाडा, लेंडेझरी, बोरगाव या गावांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार असताना दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली होती.
२०१५ चा खरीप हंगाम संपून दोन वर्ष संपली आहेत. २०१७ च्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली. सुलभ पीक कर्ज घेण्यासाठी शासनाने शिबिर लावली. पण, शेतकऱ्यांनी एप्रिल, मे मध्ये शेती पीक कर्जाची उचल केल्यानंतर, शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्यानंतर सुलभ पीककर्ज वाटप करण्याचे नाटके सुरु केल्या आहेत.

Web Title: 70 crore compensation for 26 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.