नऊ ग्राहकांवर ठोठावला ७१ हजार रूपयांचा दंड

By admin | Published: March 30, 2017 12:26 AM2017-03-30T00:26:21+5:302017-03-30T00:26:21+5:30

महावितरण, साकोली विभागातर्फे लाखनी शहर उपविभाग व सरांडी वितरण केंद्राअंतर्गत वीज चोरी करणाऱ्या ....

71 thousand rupees fine against nine customers | नऊ ग्राहकांवर ठोठावला ७१ हजार रूपयांचा दंड

नऊ ग्राहकांवर ठोठावला ७१ हजार रूपयांचा दंड

Next

साकोली उपविभागात महावितरणची कारवाई
साकोली : महावितरण, साकोली विभागातर्फे लाखनी शहर उपविभाग व सरांडी वितरण केंद्राअंतर्गत वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरुध्द विशेष मोहीम राबवित ९ ग्राहकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ७१ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई बुधवारला महावितरने केली.
या कारवाईत वीज वापर कमी होणाऱ्या ग्राहकांचे मिटर सुध्दा तपासण्यात आले. या कारवाईत साकोली विभागाचे तब्बल १९ अभियंते, ४७ लाईनस्टॉफचे कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. कारवर्इात भारतीय विद्युत विभाग कायदा २००५ अंतर्गत कलम १३५ नुसार ४ वीज ग्राहाकंवर व कलम १२५ अंतर्गत ५ ग्राहकावर कारवाई केली. धडक मोहिमेत साकोली विभागाचे २५१ मीटर तपासले व कारवाई केली.
या कारवाईत साकोली विभागाचे कार्यकारी अभियंता आर के घोटोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.जे. बेले, अमित सहारे, राजेश श्रीवास्तव, पराग हलमारे, सहायक अभियंते प्रतिक सहारे व रागिणी ढवळे कनिष्ठ अभियंते तुळशीदास पिल्लेवार व महावितरण कर्मचारी आकाडे, बोबडे, वैद्य, भुरे, बन्सोड, जांभुळकर, देवगडे यांचा सहभागी होते.
ही कारवाई भंडारा मंडळाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी व अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) शंकर कांबळे, व गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जे. एम. पारधी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 71 thousand rupees fine against nine customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.