पदवीधर मतदार संघात 72.56 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:00 AM2020-12-02T05:00:00+5:302020-12-02T05:00:16+5:30

जिल्ह्यात १२ हजार ४४० पुरुष आणि ५ हजार ९९४ महिला असे १८ हजार ४४३ मतदार आहेत. त्यापैकी ९ हजार ४६२ पुुरुष आणि ३९१३ महिला मतदारांनी अशा एकुण १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७६.०६ तर महिलांची ६५.२८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान साकोली तालुक्यात झाले असून तेथे ७८.०६ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली.

72.56 per cent turnout in the graduate constituency | पदवीधर मतदार संघात 72.56 टक्के मतदान

पदवीधर मतदार संघात 72.56 टक्के मतदान

Next
ठळक मुद्दे१३ हजार ३७५ मतदारांनी बजावला हक्क : २७ केंद्रांवर शांततेत मतदान, पुरुष ७६.०६ तर महिला ६५.२८ टक्के

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १८ हजार ४३४ मतदारांपैकी १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७२.५६ आहे. जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी ५ नंतरही काही मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे दिसत होते.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत ३५३४ मतदारांनी म्हणजे १९.१७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी २ वाजेपर्यंत ६९.२८ मतदारांनी म्हणजेच ३७.६९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १० हजार ६४९ मतदारांनी म्हणजे ५७.७७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी संथगतीने सुरु झालेले मतदान दुपारनंतर वेगाने सुरु झाले. काही मतदान केंद्रावर तर सायंकाळी ५ वाजेनंतरही मतदारांच्या रांगा दिसत होत्या. 
जिल्ह्यात १२ हजार ४४० पुरुष आणि ५ हजार ९९४ महिला असे १८ हजार ४४३ मतदार आहेत. त्यापैकी ९ हजार ४६२ पुुरुष आणि ३९१३ महिला मतदारांनी अशा एकुण १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७६.०६ तर महिलांची ६५.२८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान साकोली तालुक्यात झाले असून तेथे ७८.०६ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. मोहाडी तालुक्यात ६९.४७ टक्के, तुमसर ६६.१७ टक्के, भंडारा ७१.९९ टक्के, पवनी ७६.४३टक्के, लाखनी ७५.७९ टक्के आणि लाखांदूर तालुक्यात ७३.३० टक्के मतदान झाले. साकोली येथील मतदान केंद्र क्रमांक १५२ क्रमांकावर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान ८५.६९ टक्के झाल्याची नोंद घेण्यात आली. 
जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रावर कोवीड-१९ च्या नियमांचे पालन करुन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग तपासणी केली जात होती. प्रत्येकाला सॅनिटाईज करुन आणि हँडग्लोज व मास्क देऊनच आतमध्ये सोडल्या जात होते. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. मात्र जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रापुढे मतदारांच्या लांब रांगा लागल्याचे दिसत होते. त्यामुळे फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत होते. 
दरम्यान जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी भंडारा, लाखनी, जवाहरनगर येथील मतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यात अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 
प्रमुख राजकीय पक्षांसह १९ उमेदवारांचे भाग्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहेत. आता ३ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोण विजयी होणार यावर गावागावांत चर्चा सुरु झाल्या आहेत. 

त्या मतदाराला पोलिसांनी केले स्थानबद्ध
नागपुर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या मतदान केंद्रावर जय ओबीसी लिहिलेली टोपी आणि गळ्यात दुपट्टा घालुन आलेल्या एका मतदाराला पोलिसांनी स्थानबद्ध केले. हा मतदार मतदान केंद्रावर पोहचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्याला अडविले. आचार संहितेचा भंग होत असल्याचे सांगुन टोपी घालुन आत जाऊ नये अशी मागणी माजी सीनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी केली. यावेळी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर चांगलाच वाद झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्या मतदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करुन भंडारा पोलीस ठाण्यात नेले. यासंदर्भात ठाणेदार सुधाकर चव्हाण यांना विचारले असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा देत त्या मतदाराला ठाण्यात स्थानबद्ध केल्याचे सांगितले. तर महेंद्र निंबार्ते यांना विचारणा केली असता हा प्रकार म्हणजे सरळ सरळ आचार संहिता भंगाचा होय. त्यामुळे त्यांना रोखण्यात आले. पोलीस व मतदान केंद्राधिकाऱ्यांपुढे हा प्रकार घडल्याने आपण लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगितले. मात्र यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती झाली होती.

Web Title: 72.56 per cent turnout in the graduate constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.