फळबाग योजनेअंतर्गत ७३ हेक्टर कार्यान्वित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:26+5:302021-07-24T04:21:26+5:30
पालांदूर : चुलबंदच्या सुपीक खोऱ्यात शेतकरी सर्वच पीक घेण्यात उत्साही दिसत आहे. पिकासोबत फळबागही होत आहे. पालांदूर मंडळ कृषी ...
पालांदूर : चुलबंदच्या सुपीक खोऱ्यात शेतकरी सर्वच पीक घेण्यात उत्साही दिसत आहे. पिकासोबत फळबागही होत आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ५२ गावात ७३ हेक्टर जमिनीवर फळबाग योजना कार्यान्वित केलेली आहे. मग्रारोहयो योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग योजनेत सहभागी केली आहे.
शेतकऱ्यांचे चहूबाजूने उत्पन्न वाढविण्याकरिता शासन विविध स्तरावरून प्रयत्न करीत आहे. शासन स्तरावरून आखलेल्या योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. ती भूमिका तत्परतेने पालांदूर मंडळ कृषी कार्यालय राबविण्याकरिता प्रयत्नशील आहे. फळबाग योजना शेतकरी हितार्थ राबविली जात आहे. सर्वाधिक आंबा, फणस, चिकू, पेरू या फळांना शेतकरी पसंती देत आहे. ही फळं स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याने शेतकऱ्यांनी या फळांच्या झाडांना मागणी घातलेली आहे.
चुलबंद खोऱ्यात भाजीपाला, भात(धान) अर्थात तांदूळ, डाळवर्गीय पिके, मका, मूंगफली आदी पिके घेतले जातात. यासोबतच फळांची शेती लाभदायी ठरल्याने शेतकरी फळबागेकडे वळलेला आहे. लागवडीनंतर पुढील पाच ते सहा वर्षात फळबागातून उत्पन्न हाती येते. यापूर्वीच्या शेतकऱ्यांनी फळबाग योजनेत घेतलेल सहभाग नव्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात. त्यांचे अनुकरण इतर शेतकरी करीत आहेत. त्यामुळे फळबाग योजना यशस्वीपणे राबविली जात आहे.
कोट
शासनाकडून फळबाग योजनेकरिता सर्वतोपरी प्रोत्साहन मिळत असल्याने शेतकरीसुद्धा उत्साहित आहे. मग्रारोहयो योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग योजनेत समाविष्ट केले जात आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन लागवडीच्या अनुषंगाने माहिती पुरविली जात आहे. शेतकरी बांधवांनीसुद्धा फळबाग योजनेत सहर्ष सहभाग नोंदविला आहे. कृषी विभागाकडून पुरविलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास फळबाग योजना निश्चितच फलदायी ठरणार आहे.
गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर.
(फोटो)