63 प्रकल्पात 74.80 टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:00 AM2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:16+5:30
भंडारा जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. चांदपूर, बघेडा, बेटेकर बाेथली आणि साेरणा या प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ४२.८१ दलघमी असून सध्या स्थितीत या प्रकल्पात ३६.४९६ दलघमी जलसाठा आहे. याची टक्केवारी ८५.२४ आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ७८.४६ टक्के जलसाठा हाेता. यावर्षी चांदपूर प्रकल्पात ८७.२९ टक्के, बघेडा ८३.९६, बेटेकर बाेथली प्रकल्पात ८३.१७ टक्के, साेरणा प्रकल्पात ७७.२२८ टक्के जलसाठा हाेता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील ६३ सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत ७४.८० टक्के जलसाठा आहे. मात्र शेवटच्या चरणात काेसळलेल्या पावसाने जलसाठ्यात वाढ झाली असून, सात लघु प्रकल्प आणि १५ मामा तलाव १०० टक्के भरले आहे. यामुळे याेग्य नियाेजन केल्यास रबी हंगामात शेतकऱ्यांना मुबलक पााणी उपलब्ध हाेऊ शकते.
भंडारा जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. चांदपूर, बघेडा, बेटेकर बाेथली आणि साेरणा या प्रकल्पांचा समावेश आहे. प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ४२.८१ दलघमी असून सध्या स्थितीत या प्रकल्पात ३६.४९६ दलघमी जलसाठा आहे. याची टक्केवारी ८५.२४ आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत ७८.४६ टक्के जलसाठा हाेता. यावर्षी चांदपूर प्रकल्पात ८७.२९ टक्के, बघेडा ८३.९६, बेटेकर बाेथली प्रकल्पात ८३.१७ टक्के, साेरणा प्रकल्पात ७७.२२८ टक्के जलसाठा हाेता. या प्रकल्पातून पाण्याचे याेग्य नियाेजन केल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध हाेणार आहे.
जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून, या प्रकल्पाची संकल्पीय उपयुक्त क्षमता ५३.५४ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात ३६.६५ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ६८.४६ आहे. गतवर्षी याच कालावधीत ७३.३६ टक्के जलसाठा हाेता. जिल्ह्यातील २८ मामा तलावही यावर्षी तुडुंब भरले आहे. मामा तलावात सध्या २१.२० दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी ८३.४७ आहे. गतवर्षी ६३.९७ टक्के जलसाठा हाेता.
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणी असले तरी याेग्य नियाेजनाअभावी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहाेचत नाही. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागते.
सात लघु प्रकल्प आणि १५ मामा तलाव तुडुंब
- जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांपैकी सात प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहे. त्यात तुमसर तालुक्यातील परसवाडा, माेहाडी तालुक्यातील टांगा, पवनी तालुक्यातील वाही, पिलांद्री, साकाेली तालुक्यातील गुढरी, लाखनी तालुक्यातील मुरमाडी हमेशा, वाकल या लघुप्रकल्पांचा समावेश आहे, तर जिल्ह्यातील २८ पैकी १५ मामा तलाव १०० टक्के भरले आहे. त्यात साकाेली तालुक्यातील चांदाेरी, पाथरी, सावरबंध, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, रेंगेपार काे., लाखनी तालुक्यातील कनेरी, चान्ना, तुमसर तालुक्यातील लाेभी आणि लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राड व इंदाेरा मामा तलावांचा समावेश आहे.