७४ गावात कारभारी आज होणार विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:52+5:302021-02-12T04:33:52+5:30

भंडारा : जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या १४८ ग्रामपंचायतींपैकी ७४ ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंचांची निवड शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी होत ...

74 villages will be in charge today | ७४ गावात कारभारी आज होणार विराजमान

७४ गावात कारभारी आज होणार विराजमान

Next

भंडारा : जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या १४८ ग्रामपंचायतींपैकी ७४ ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंचांची निवड शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात होणाऱ्या या निवडीची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर उर्वरित ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचांची निवड १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. आता या गावातील सरपंच व उपसरपंचाची निवड होत आहे. भंडारा जिल्ह्यातील १४८ पैकी ७४ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचांची निवड १२ फेब्रुवारी रोजी होत असून त्यात तुमसर तालुक्यातील ९, मोहाडी तालुक्यातील ९, भंडारा तालुक्यातील १७, पवनी तालुक्यातील १४, लाखनी तालुक्यातील १०, साकोली तालुक्यातील १० आणि लाखांदूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तहसील प्रशासनाने सरपंच,उपसरपंच निवडीबाबत संपूर्ण तयारी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ,उपसरपंचाची निवड सदस्य करणार आहेत.

आरक्षण सोडतीनंतर अनेक ग्रामपंचायतीत सरपंच पदाची चुरस वाढल्याचे दिसून आले तर अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले आहे. सरपंचपद नाही तर उपसरपंचपद तरी मिळावे यासाठी निवडून आलेले सदस्य प्रयत्न करीत आहेत.

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी तुमसर, मोहाडी, भंडारा, पवनी, साकोली लाखनी आणि लाखांदूर तहसीलदारांना पत्र पाठवून सरपंच,उपसरपंच निवड करण्याची मंजुरी दिली आहे. सरपंच निवडीसाठी गावात मोर्चेबांधणी सुरु आहे. जिल्ह्यातील उर्वरित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक १५ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठीही प्रशासन सज्ज झाले असून संबंधित सदस्यांना सूचना दिली आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये निवड प्रक्रिया

तुमसर तालुका - पिपरी चुन्नी, गोंडीटोला, पवनारखारी, लेंडेझरी, मांढळ, स्टेशनटोली, आंबागड, कवलेवाडा, सुकळी नकुल.

मोहाडी तालुका - कान्हळगाव (सि.), पिंपळगाव (का), पिंपळगाव (झ), पाचगाव, मांडेसर-रामपूर, जांभोरा-किसनपूर, पांजरा-बोरी, खडकी, केसलवाडा.

भंडारा तालुका - टेकेपार (डो), सालेबर्डी, पलाडी, माडगी, बेलगाव, खुटसावरी, गुंथारा, खुर्शीपार, सोनुली, राजेगाव, चोवा, लावेश्वर, कोका, पचखेडी, करचखेडा, रावणवाडी, टवेपार.

पवनी तालुका - पिलांद्री, कातुर्ली, ब्रम्ही, कवलेवाडा, मिन्सी, खांबाडी, सावरला, शेळी (सोम), खातखेडा, कोरंभी, वाही, मेंढेगाव, तिर्री, निष्टी.

लाखनी तालुका - सोमलवाडा, रेंगेपार कोठा, दैतमांगली, धाबेटेकडी, रामपुरी, खेडेपार, सिंधीपार (मुंडीपार), रेंगेपार कोहळी, सिपेवाडा, चान्ना.

साकोलीत १० ग्रामपंचायती

साकोली तालुक्यातील १० आणि लाखांदूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींमध्ये निवड होत आहे.

साकोली तालुका - उसगाव, पळसपाणी, घानोड, आमगाव (बु.), उमरझरी, खैरी (वलमा), बोरगाव, पळसटोला, खांबा.

लाखांदूर तालुका - गुंजेपार - किन्ही, पारडी, कोच्छी - दांडेगाव, मांदेड - सावरगाव, कन्हाळगाव - चिचगाव.

Web Title: 74 villages will be in charge today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.