७.६५ टक्के विद्यार्थ्यांनी अडविली शाळांची संचमान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:34+5:302020-12-30T04:44:34+5:30
माेहाडी : विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट झाल्याशिवाय संच मान्यता केली जाणार नसल्याने शिक्षण विभागासह मुख्याध्यापक आणि शिक्षक आधारकार्ड अपडेट करण्यासाठी ...
माेहाडी : विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट झाल्याशिवाय संच मान्यता केली जाणार नसल्याने शिक्षण विभागासह मुख्याध्यापक आणि शिक्षक आधारकार्ड अपडेट करण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसत आहे. केवळ ७.५ टक्के आधार कार्ड अपडेट झाले नाही. मात्र अनेक शाळांची संचमान्यता त्यामुळे अडविली जाण्याची शक्यता आहे.
सर्व विभागाच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार नाेंदणी व अध्ययावतीकरण करण्याचे काम सरळ प्रणालीमध्ये शिक्षकांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत करावी अशी डेडलाईन शालेय शिक्षण विभागाने घालून दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील शाळाने ९२.३५ टक्के आधार नाेंदणीचे काम केले आहे. केवळ ७.६५ टक्के नाेंदणीचे काम बाकी आहे.
सर्वाधिक पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आधार नाेंदणीचे काम शिल्लक आहे. काेराेनामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा अजूनही सुरु झाल्या नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकाने मुलाचे आधार काढले नाही. काहींनी काढले पण ते अपडेट हाेत नाही. काही पालकांकडून आधार नाेंदणीची पावती हरविली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा आधार नाेंदणी हाेत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. पाच ते पंधरा वर्ष पूर्ण हाेणाऱ्या विद्यार्थांच्या हाताचा ठसा आधार नाेंदणीमध्ये बायाेमॅट्रीक अपडेट हाेत नसल्याची काही पालकांची समस्या आहे. शिक्षकांची पदे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर अवलंबून असतात. त्यामुळे सर्वात जास्त काळजी मुख्याध्यापकांना आहे.
मुख्याध्यापकांची होतेय दमछाक
आपल्या शाळेतील एकही विद्यार्थी सरळ प्रणालीत आधार नाेंदणीतून सुटणार नाही. यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांची दमछाक हाेत आहे. पालकांच्या भेटी घेणे, आधारकार्ड तयार झाल काय? याची विचारणा करणे, आधारकार्ड तयार हाेण्यास व अपडेट करण्यास येणाऱ्या पालकांच्या अडचणीचा मनस्ताप मुख्याध्यापकांवर येत आहे. संच मान्यतेसाठी हा खटाटाेप.
आधारकार्ड नाेंदणीचे १०० टक्के उद्दिष्ट हाती घेतले आहे. जिल्ह्यात काम उत्कृष्ट केले जात आहे. सर्व गट शिक्षणाधिकारी काळजीने कामाला लागले आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक यासाठी परिश्रम धेत आहेत. लवकरच उद्दिष्ट पूर्ण हाेईल.
- मनाेहर बारस्कर, शिक्षणाधिकारी