७.७६ लाखांची दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 10:03 PM2017-09-24T22:03:53+5:302017-09-24T22:04:07+5:30

तालुक्यातील इंदोरा येथे गस्तीवर असताना लाखांदूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर धाड घालुन ७.७६ लाखांची दारू व अन्य मुद्देमाल जप्त केला.

7.76 lakh liquor seized | ७.७६ लाखांची दारु जप्त

७.७६ लाखांची दारु जप्त

Next
ठळक मुद्देलाखांदूर पोलिसांची कामगिरी: दोन दिवसात तिसरी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील इंदोरा येथे गस्तीवर असताना लाखांदूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर धाड घालुन ७.७६ लाखांची दारू व अन्य मुद्देमाल जप्त केला. दोन दिवसातील ही तिसरी कारवाई असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद असल्याने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून लाखांदूरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. खबºयाच्या माध्यमातून माहिती घेऊन पोलीस निरीक्षक डी. डब्लू. मंडलवार यांनी संपूर्ण तालुक्यात नाकाबंदी करून अवैधरीत्या दारू वाहतूक करणाºयांच्या मुसक्या आवळणे सुरू केले. दोन दिवसांपूर्वी कारवाई केल्यानंतर पुन्हा शनिवारला इंदोरा येथे खबरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कान्हाळगाव ते इंदोरा मार्गावर पोलिसांनी एका पांढºया रंगाच्या गाडीला थांबवले, मात्र गाडी न थांबता वेगाने पळ काढला, चारही मार्गावर नाकेबंदी करून गाडीचा सिनेस्टाईलने पाठलाग केला.
अखेर चिखलात गाडी फसल्याने गाडीचालक व एक साथीदार गाडी सोडून जंगलात पळून गेले. गावकºयांच्या मदतीने गाडी व गाडीतील दारू लाखांदूर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. इंग्रजी दारू किंमत ७ लक्ष ६६ हजार रुपये, गाडी क्र. एम एच ०१ एम ए ५५८३ किंमत ६ लक्ष, असा मुद्देलाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी टिक्कस, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक डी. डब्लू. मंडलवार, पोलीस हवालदार प्रेमलाल भोयर, पोलीस नायक अशोक मांदाळे, पोलीस नायक लोकेश ढोक, शिपाई प्रफ्फुल कठाने, हवालदार विष्णू खंडाते, पोलीस नायक रवींद्र मुंजमकर, शिपाई प्रमोद टेकाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

लाखांदूर तालुक्यात देशी व विदेशी दारूचे अनेक दुकाने आहेत. लगतच्या दोन्ही जिल्ह्यात दारू बंद आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात जाण्याचा मार्ग लाखांदूर मधूनच आहे. अवैध दारू वाहतूक ही याच मार्गाने होत असली तरी पकडलेली दारू ही लाखांदूर तालुक्यातील नसून तालुक्याबाहेरील दुकानातील असल्याचे तपासातून उघड झाले. पुन्हा कामाला लागून तालुक्यातून अवैद्य दारू वाहतूक बंद करणार आहे.
- डी. डब्लू. मंडलवार,
पोलीस निरीक्षक लाखांदूर

Web Title: 7.76 lakh liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.