८० सागवान वृक्षांची परवानगीविना कत्तल

By admin | Published: August 25, 2016 12:26 AM2016-08-25T00:26:51+5:302016-08-25T00:26:51+5:30

वृक्षसंवर्धन व वृक्षतोडीची जबाबदारी वन विभागावर आहे. भंडारा वनविभाग कार्यालयातील ८० सागवान व १२९ आडजात झाडे ...

80 slaughter houses without permission of tamarind trees | ८० सागवान वृक्षांची परवानगीविना कत्तल

८० सागवान वृक्षांची परवानगीविना कत्तल

Next

भंडारा वनविभागातील प्रकार : अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे अंगुलीनिर्देश
प्रशांत देसाई भंडारा
वृक्षसंवर्धन व वृक्षतोडीची जबाबदारी वन विभागावर आहे. भंडारा वनविभाग कार्यालयातील ८० सागवान व १२९ आडजात झाडे आॅक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात तोडण्यात आली. मात्र, या वृक्षतोडीला परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे.
भंडारा वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील ही वृक्षतोड आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आलेली आहे. वनविभागाचे विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय हे भंडारा नगरपालिका क्षेत्रात येते. त्यामुळे वनविभाग वृक्षांचे पालक असले तरी, हे वृक्ष तोडण्यासाठी वनविभागालाही वृक्षतोडीचे अधिकार नाहीत. वनविभागाला अशास्थितीत वृक्षतोड करण्यासाठी ‘वृक्षाधिकारी’ असलेल्या पालिका मुख्याधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय वृक्षतोड नियमबाह्य ठरते. त्यानुसार, भंडारा वनविभागाच्या विभागाीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील वृक्षतोड करण्यासाठी पालिकेकडून परवानगी घेण्याची गरज आहे.
कार्यालयाचा विस्तार करण्याचा मुद्दा समोर करून वनविभागाने विभागीय कार्यालयातील काही वृक्षांना तोडण्याचा प्रस्ताव ११ सप्टेंबर २०१५ रोजी पालिकेकडे सादर केला. त्यानुसार पालिकेने ६ नोव्हेंबर २०१५ ला एक जांभूळ व सागवानाचे ११ वृक्ष तोडण्याची परवानगी दिली. सरसकट वृक्षतोडीची परवानगी नसताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सर्वच झाडे तोडण्याचा गंभीर प्रकार केला आहे. आता मात्र प्रकरण अंगलट येईल, या भितीने अधिकाऱ्यांनी सावरासावर तथा कनिष्ठांवर जबाबदारी सोपविली होती, अशी भूमिका घेऊन स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान पालिकेने किती वृक्षतोडीची परवानगी दिली याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांना विचारले असता त्यांनी, ६ नोव्हेंबरला १२ वृक्षतोडीची परवानगी दिली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे परवानगी पत्र प्राप्त झाले. त्याबाबत निश्चित सांगता येत नाही. त्यानंतर परवानगी विभागाचे आठले यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयातील दस्तावेज बघून सांगावे लागेल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

२०९ वृक्ष विनापरवाना तोडले
वनविभागाने पुन्हा वृक्ष तोडण्याची परवानगी मागितली. यात सागवान ८० वृक्ष तर आडजात १२९ वृक्षांचा समावेश होता. यात विभागीय कार्यालयातील सागवान ५७ व आडजात ८० व वनपरिक्षेत्र कार्यालयातील २३ सागवान व ४९ आडजात वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांना तोडण्याची परवानगी पालिकेने अद्याप वनविभागाला दिलेली नाही. असे असतानाही वनविभागाने त्यांच्या कार्यालय परिसरातील वनसंपदांची कत्तल केल्यानंतर त्यांची गडेगाव लाकूड आगारात कोट्यवधी रुपयात लिलाव करण्यात आला. यातूनही लिलाव घेणाऱ्यांची चक्क वनविभागानेच फसगत केल्याचा हा प्रकार आता उघडकीस आल्याने सर्वांनी एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरु आहे.

ही वृक्षतोड उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांच्या कार्यकाळात झालेली आहे. त्यांच्या निर्देशानुसार सर्व काम झालेले आहे. माझा यात हस्तक्षेप नसून मला याची माहिती नाही.
- संजय मेश्राम, वनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा.

Web Title: 80 slaughter houses without permission of tamarind trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.