जिल्ह्यात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:03+5:302021-08-12T04:40:03+5:30

भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून, आतापर्यंत ६४५.१ मिमी पाऊस काेसळला आहे. १ जून ते १० ऑगस्टपर्यंत सरासरी ...

84% of average rainfall in the district | जिल्ह्यात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

जिल्ह्यात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस

Next

भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून, आतापर्यंत ६४५.१ मिमी पाऊस काेसळला आहे. १ जून ते १० ऑगस्टपर्यंत सरासरी ७७२.१ मिमी पावसाची नाेंद केली जाते. मात्र आतापर्यंत काेसळलेला पाऊस हा सरासरीच्या केवळ ८४ टक्के आहे. गत दहा दिवसांपासून तर पावसाने दडी मारल्याचे दिसत आहे. कधीतरी पावसाची एखादी सर काेसळते आणि दिवसभर कडक ऊन पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील राेवणीची कामे रखडली आहेत. अनेक शेतकरी आता कालव्याचे पाणी साेडण्याची मागणी करीत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत भंडारा तालुक्यात ५०४.५ मिमी, माेहाडी ८२२.५ मिमी, तुमसर ५५४.६ मिमी, पवनी ५९२.६ मिमी, साकाेली ६४१.३ मिमी, लाखनी ७४३.९ मिमी पाऊस काेसळला आहे. आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांपुढे माेठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

Web Title: 84% of average rainfall in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.