काेराेना वर्षात मद्यपींनी रिचविली ८४ लाख लीटर दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:44+5:302021-04-11T04:34:44+5:30
वाईनची विक्री वाढली उच्चभ्रू नागरिकांमध्ये वाईन सेवन करण्याचे फॅड भंडारा जिल्ह्यातही वाढत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट ...
वाईनची विक्री वाढली
उच्चभ्रू नागरिकांमध्ये वाईन सेवन करण्याचे फॅड भंडारा जिल्ह्यातही वाढत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट हाेते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात वाईन विकण्यात आली हाेती. तर२०१९-२० मध्ये ११ हजार ५६०लीटर वाईन विकली गेली हाेती. दाेन हजार ५८७ वाईनच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
लाॅकडाऊनने एप्रिलमध्ये विक्री शून्य
गतवर्षी एप्रिल महिन्यात काेराेना संसर्गाने लाॅकडाऊन घाेषित करण्यात आले हाेते. मद्यविक्रीलाही बंदी करण्यात आली हाेती. त्यामुळे मद्यपींची माेठी अडचण झाली हाेती. या कालावधीत जिल्ह्यात कुठेही एक लीटर दारू विकली गेली नाही. मात्र लाॅकडाऊन लागण्यापूर्वी अनेकांनी दारूचा साठा करून ठेवला हाेता. तर काहींनी आपला शाेक हातभट्टीच्या दारूवर भागविला हाेता.
बाॅक्स
महिना देश-विदेशी बिअर वाईन
एप्रिल ०० ०० ०० ००
मे ३८५९७३ ३४१४५ ९९१८६ २०१४
जून ६०७७२५ ११३९९८ ८७३७९ ८८९
जुलै ६८२६६२ ११९१७६ ६६०५१ ९४८
ऑगस्ट ६५९२०३ १३०६२१ ५३२०० ८३८
सप्टेंबर ५३१०१७ १२१६७४ ६१४८४ ७१२
ऑक्टाेबर ५१६३९२ ११७६६२ ५४८१९ ९२७
नाेव्हेंबर ५९४६१६ १६९३५५ ६४१६२ ११४१
डिसेंबर ५९४०९५ १७४७२४ ५९४२४ १४७७
जानेवारी ६८७४४१ १६८६०४ ७०६९१ ११६३
फेब्रुवारी ५५६८७९ १५६६६१ ७५६९४ १७०६
मार्च ९९०८१३ १९६४०२ १४५८४० २५२८
एकुण ६८०६५२६ १५०२९५२ ८३७२३० १४३४५