८५ टक्के मतदार आधार ‘लिंकिंगविना’

By admin | Published: May 25, 2015 12:46 AM2015-05-25T00:46:02+5:302015-05-25T00:46:02+5:30

बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची धडक मोहीम मागील ...

85 percent voter base without 'linking' | ८५ टक्के मतदार आधार ‘लिंकिंगविना’

८५ टक्के मतदार आधार ‘लिंकिंगविना’

Next

बोगस मतदार शोधमोहीम : आधार लिंकिंग मोहीम थंडावली
देवानंद नंदेश्वर भंडारा
बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची धडक मोहीम मागील महिन्यांपासून हाती घेतली आहे; परंतु आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार मतदारांनीच आधार लिंकिंग केले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडण्याच्या या मोहिमेला मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यात ९ लाख २८,४५३ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४ लाख ७२,१४३ पुरुष, ४ लाख ५६,२९७ महिला व १३ इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ९ लाख २८,४५३ नागरिक १८ वर्षांवरील आहेत. त्यामुळे बनावट मतदार शोधून अचूक मतदार यादी बनविण्याच्या दृष्टिकोनातून मतदार यादीला आधारकार्डाची जोड दिली जात आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्डमधील माहितीची सांगड घालावी, याबाबत राज्य व केंद्रसरकारच्यावतीने देशभरातील मतदारांची लिंक आधारकार्डशी जोडण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बोगस मतदार समोर येणार आहेत.
मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे व ती माहिती प्रमाणित करण्यासाठी मतदारांची लिंक आधार कार्डशी जोडण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे.
बोगस मतदान कार्डला आळा बसविणे, एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असलेल्या मतदारांचे अन्य ठिकाणी असलेले नाव वगळणे, मतदार यादीमधील चुका, मतदार ओळखपत्रामधील दुरुस्त्या आदी सुधारणा या लिंकमुळे शक्य होणार आहे. राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला आॅनलाइनची जोड देण्यात आली आहे. मतदारांना घरबसल्या निवडणूक आयोगाच्या नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल या वेबसाइटवर मतदार कार्डाला आधार कार्डाची जोड देता येणार आहे. वेबसाइट, एसएमएस, टोल फ्री क्रमांक, तहसील कार्यालय व आधार कार्ड यांची सांगड घालता येणार आहे. पहिल्या टप्प्यात आॅनलाइन प्रक्रिया होत असून, संगणकाची माहिती नसणाऱ्या मतदारांच्या घरोघरी जाऊन ही माहिती गोळा केली जात आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मागील महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील केवळ १ लाख ४० हजार मतदारांनीच आत्तापर्यंत आधारकार्डशी मतदार ओळखपत्राच्या क्रमांकाची जोडणी केलेली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने राज्यभर ही मोहीम राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला मतदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे उर्वरित मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर उभे ठाकले आहे.

मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी मतदार यादीतील नोंद थेट आधार कार्डशी जोडण्यात येत आहे. ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांकडे आधार कार्डच उपलब्ध नसल्याने त्या मतदारांचे आधार लिंकिंग होणे शक्य नाही.
कामे रखडली
आधार कार्डअभावी मतदार यादीला आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे मतदार आधार कार्डशी लिंक करण्याकरिता मतदारांना आधार कार्ड उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. यामुळे नागरिकांची विविध काम थांबलेली आहेत.

Web Title: 85 percent voter base without 'linking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.