८८ हजार व्यक्तींना सहव्याधी; तातडीने घ्यावा लागणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:27+5:302021-06-02T04:26:27+5:30
भंडारा : कोरोना काळात रुग्णांची संख्या वाढू नये, याकरिता राज्य शासनाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान हाती घेतले. ...
भंडारा : कोरोना काळात रुग्णांची संख्या वाढू नये, याकरिता राज्य शासनाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान हाती घेतले. आरोग्य विभागाचे २ हजार ६०७ व्यक्तींचे चमू या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आशा आणि अंगणवाडीताई यामध्ये सहभागी झाल्या होत्या. दीर्घकाळ चाललेल्या या सर्वेक्षणातून ८८ हजार ७५३ रुग्ण कोमॉर्बिड आढळले.
या रुग्णांना शुगर, बीपी आणि इतर आजार असल्याने त्यांना जपण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशा रुग्णांची आरोग्य विभागाने वारंवार तपासणी केली. या रुग्णांना इतर तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या सर्वेक्षणात सारीचा एकही रुग्ण आढळून आला नाही. ९७ रुग्ण चाचणीनंतर पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर कोरोनासारख्या भयंकर आजारातून त्यांची सुटका झाली. पुढील काळातही या रुग्णांना जपले जाणार आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने संपूर्ण नियोजन तयार केले आहे.
बॉक्स
कोमॉर्बिड रुग्णांची काळजी घ्या
कोरोना काळामध्ये शुगर आणि बीपी रुग्ण असणाऱ्यांना सर्वाधिक व्याधी झाल्याचे निदर्शनास आले. आता पुढील लाटेतही या रुग्णांना जपावे लागणार आहे. तरच कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या थांबविण्यात आरोग्य विभागाला मोठे यश मिळणार आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने संपूर्ण नियोजन केले आहे. वारंवार अशा रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
बॉक्स
कोविडचे ९७, सारीचे रुग्ण निरंक
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणात आरोग्य विभागाला मोठा डाटा उपलब्ध झाला आहे. यामध्ये ८८ हजार ७५३ कोमॉर्बिड रुग्ण सापडले. यातील ९७ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, तर सारीचे एकही रुग्ण नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे. या रुग्णांवर नंतरच्या काळात उपचार करण्यात आले. सध्या कोमॉर्बिड रुग्णांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. त्यांची वारंवार तपासणी करून माहिती घेतली जात आहे.
कोट
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानात आरोग्य विभाग, अंगणवाडीताई, आशा, आरोग्य कर्मचारी यांनी संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतरच्या उपाययोजना तातडीने करण्यात आल्या. याशिवाय कोमॉर्बिड रुग्णांवर नजर ठेवण्यात आली. यामुळे कोरोनाची साथ रोखताना मोलाची मदत झाली. आता पुढील काळातही हा दस्तऐवज उपयोगी पडणार आहे. आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.