वर्षभरात आढळले कर्करोगाचे ९३ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:06 PM2018-02-07T23:06:02+5:302018-02-07T23:06:59+5:30

४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत कर्करोग पंधरवडा साजरा होत आहे. या पंधरवड्याचे आयोजन जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांच्या हस्ते करण्यात आले.

9 3 patients diagnosed during the year | वर्षभरात आढळले कर्करोगाचे ९३ रूग्ण

वर्षभरात आढळले कर्करोगाचे ९३ रूग्ण

Next
ठळक मुद्देशाळांमध्ये जनजागृती : कर्करोग पंधरवडाचे आयोजन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : ४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत कर्करोग पंधरवडा साजरा होत आहे. या पंधरवड्याचे आयोजन जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिता बढे, नोडल अधिकारी डॉ.चाचेरकर, जिल्हा सल्लागार डॉ.समीम फराझ, दंत शल्य चिकित्सक डॉ.सुधा मेश्राम उपस्थित होते.
यावेळी डॉ.धकाते यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग किती गंभीर रुप घेऊ शकतो तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून कसे अलिप्त रहावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सांगता तंबाखू विरोधी शपथ घेऊन करण्यात आली.
या कर्करोग पंधरवडा कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी यांची कार्यशाळा पोलीस विभागासोबत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत रांगोळी, निबंध, पोस्टर अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य शासनाच्यावतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम २०१२-१३ पासून सुरु झालेला आहे. या अंतर्गत तंबाखू नियंत्रण कक्ष तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन करत आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळ तंबाखू बाळगल्यास व खातांना आढळून आढळल्यास त्यांच्याकडून २०० रुपये चालान केले जाते. तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम कसे होतात याविषयी जागृती निर्माण करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी शिबिर आयोजित करून सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करून गाव व परिसर तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २०१६-१७ या कालावधीत कर्करोगाचे रूग्ण आढळून आले आहे. मुख कर्करोग ४९, स्तनाचा कर्करोग ५, गर्भाशयाचा कर्करोग ४, इतर कर्करोग ३४ असे एकुण ९३ कर्करोगाचे रूग्ण आढळून आले आहेत.
मौखिक तपासणीत आढळले १८ कर्करुग्ण
भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणी मोहिमेत १८ कर्करुग्ण आढळून आले आहेत. राज्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात जिल्ह्यात ४ लक्ष ५१ हजार ८९३ नागरिकांचा सहभाग होता. ७५ हजार ६४५ नागरिकांनी स्वत:हून तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी केली होती. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ३ लक्ष ७६ हजार २४८ नागरिकांची तपासणी केली. यात ४८ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले.

Web Title: 9 3 patients diagnosed during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.