नऊ महिन्यात ९८ कर्क रूग्णांवर उपचार

By Admin | Published: February 3, 2015 10:50 PM2015-02-03T22:50:21+5:302015-02-03T22:50:21+5:30

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोगावर नियंत्रण घालण्याकरिता जगजागरण करण्यात येत आहे. असे असले तरी, एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात जिल्हा सामान्य

9 8 cancer patients treated in nine months | नऊ महिन्यात ९८ कर्क रूग्णांवर उपचार

नऊ महिन्यात ९८ कर्क रूग्णांवर उपचार

googlenewsNext

भंडारा : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोगावर नियंत्रण घालण्याकरिता जगजागरण करण्यात येत आहे. असे असले तरी, एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालयात कर्करोगाचे ९८ रूग्णांवर उपचार करण्यात आले. बुधवारी जागतिक कर्करोग दिन असल्याने सामान्य रूग्णालयात कर्करोग सप्ताह तसेच रूग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
यावेळी पातुरकर यांनी, २०१३-१४ या वर्षात ५४४ जणांची संशयीत रूग्ण म्हणून तपासणी करण्यात आली. यात १४४ जणांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. कर्करोग बाधितांमध्ये ३२ रूग्णांना तोंडाचा आजार, १० जणांना मानेचा आजार, ३४ जणांना स्तनाचा आजार तर ६८ जणांना अन्य आजाराने ग्रासले होते. यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात ३८९ संशयीत रूग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी ९८ रूग्णांना कर्करोग झालेल्याच निदान झाले. यातील १५ जणांना तोंडाचा आजार, १२ जणांना मानेचा कर्करोग, २२ जणांना स्तनाचा कर्करोग तर ४९ जणांना अन्य ठिकाणचा कर्करोगाने बाधित केले.
कर्करोग अजूनही बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. त्यामुळे कर्करोगासंबंधी जनजागृतीच्या कार्यक्रमात अडचणी येतात. आरोग्यदायी वर्तणूक, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास आरोग्य संस्थेत जाऊन निदान करून घेणे आदिबाबत जागरूकता नाही. त्यामुळे अनेकजण वंचित राहत आहे. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूपैकी २२ टक्के मृत्यूला तंबाखू कारणीभूत आहे. कर्करोग रूग्णांच्या निदानासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा, उपजिल्हा रूग्णालय, तुमसर, साकोली व ग्रामीण रूग्णालय पवनी, लाखांदूर येथे शिबिर अयोजित केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 9 8 cancer patients treated in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.