फेसबुकवरून मोबाईल खरेदीत ९३ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:45+5:302021-06-17T04:24:45+5:30
निखिल मधुकर रुषेसरी (२७, रा. वैशालीनगर, खात रोड, भंडारा) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. मरीयम मरीयाह या फेसबुक ...
निखिल मधुकर रुषेसरी (२७, रा. वैशालीनगर, खात रोड, भंडारा) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. मरीयम मरीयाह या फेसबुक अकाउंटवरून वन प्लस ८ कंपनीचे मोबाईल ३० हजार रुपयात आणि तेही एकावर एक फ्री अशी पोस्ट निखिलच्या फेसबुकवर आली. ही पोस्ट पाहून तो हुरळून गेला. चॅट करून मोबाईल खरेदी करायचे आहे. पेमेंट कशा पद्धतीने करायचे, अशी विचारपूस केली. त्यावेळी आरोपीने पेटीएमद्वारे पेमेंट केल्यास तत्काळ मोबाईल पाठविण्यात येईल, असे सांगितले. त्याच्या गोड बोलण्यावर फसून निखिलने ॲडव्हान्स म्हणून सुरुवातीला ९ हजार रुपये, तर इतर चार्जेस २७ हजार असे करीत त्याने तब्बल ९३ हजार रुपये या खात्यात पाठविले. परंतु मोबाईल आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून मरीयम मरीयाह या धारकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.