उमरी येथे ९५ टक्के लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:43+5:302021-09-12T04:40:43+5:30

आजपर्यंत किती जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला, किती लाभार्थी वंचित राहिले, वंचित राहण्याची कारणे व सर्वांना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्यासाठी ...

95% vaccination completed at Umri | उमरी येथे ९५ टक्के लसीकरण पूर्ण

उमरी येथे ९५ टक्के लसीकरण पूर्ण

googlenewsNext

आजपर्यंत किती जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला, किती लाभार्थी वंचित राहिले, वंचित राहण्याची कारणे व सर्वांना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासंदर्भात जनजागृती करणे व शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणे या संदर्भात चर्चा करण्यात आली. गावातील १८ वर्षांवरील ९५ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून केवळ आजारी, वयोवृद्ध, गरोदर माता व बाहेरगावी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले व्यक्ती यांचे लसीकरण शिल्लक आहे, अशी माहिती या वेळी सरपंच शेंदरे यांनी उपस्थितांना दिली. गावाची लोकसंख्या जास्त असली तरी गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे कार्य आपल्याला पार पाडायचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले. सभेला प्रामुख्याने ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, माजी सरपंच मंगला कापगते, तलाठी ताराचंद मेश्राम, ग्रामविकास अधिकारी पी.जी. साखरे, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे पी.जी खरवडे, एम. आर. लांडेकर, डी. एम. साखरे, डी. वाय. डुंभरे, एम. जे. गोटेफोडे, नम्रता विद्यालयाचे एन. आर. बोरकर, जी. एस. संग्रामे, जी. बी. डोंगरवार, एच. ए. भाजीपाले, बी. टी. थेर, आर. यु. लोहंबरे, यु. एम. कापगते, व्ही. एच. लंजे, वाय. आर. आगाशे, पी. एस. चव्हाण, सी. के. कापगते तसेच सर्व अंगणवाडी शिक्षिका व सेविका आदी उपस्थित होते.

[9/11, 5:02 PM] Talthe Meshram: बचतगटाच्या CRP, मंगला कापगते, पुस्पाताई नागोसे यांनी सर्वांनी स्वतःजवळची माहिती पुरविली.

[9/11, 5:02 PM] Talthe Meshram: प्राचार्य, तीतीरमारे सर, नम्रता विद्यालय, आरोग्य उपकेंद्राचे, CHO डोंगरावर मॅडम , देवला सिस्टर

Web Title: 95% vaccination completed at Umri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.