९.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:51 PM2018-03-07T23:51:59+5:302018-03-07T23:51:59+5:30
दारूची तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडून ९ लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पवनी व वाही परिसरात गस्तीवर असताना करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : दारूची तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडून ९ लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पवनी व वाही परिसरात गस्तीवर असताना करण्यात आली.
चारचाकी स्कॉर्पिओ कंपनीची (एम.एच. ३१/बी.बी. ९१५७) असलेले वाहन पथकाला येताना दिसले. वाहनाला थांबविण्याचा इशारा दिला असता वाहनचालकाने वाहनाचा वेग वाढवून पुढे नेली. या वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता १०० खरड्याच्या पेट्यात देशीदारू ९० मिलीच्या १० हजार सिलबंद बाटल्या व वाहनासह आरोपी प्रदीप पंढरी टापरे रा.भंडारा, आकाश पुरूषोत्तम नंदेश्वर रा.बारव्हा यांच्या ताब्यातून देशी दारूच्या १०० पेट्या व वाहनासह ९ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली.
पवनी तालुक्याला लागून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असल्याने देशी दारूचा हा साठा चंद्रपूर जिल्ह्यात जात असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक राजू उरकुडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरसिंग उईनवार, जवान हेमंत कांबळे, विनायक हरीणखेडे, स्वप्नील लांबट, रविंद्र बावनकुडे व वाहनचालक विष्णू नागरे यांनी केली. तपास निरीक्षक राजू उरकुडे हे करीत आहेत.