पाण्याच्या टाक्यात बुडून १४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू, राजापूर येथील घटना

By युवराज गोमास | Published: October 26, 2023 03:20 PM2023-10-26T15:20:15+5:302023-10-26T15:21:08+5:30

ही घटना तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील राजापूर येथे २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९:३० वाजताचे दरम्यान घडली.

A 14-month-old boy died after drowning in a water tank, an incident in Rajapur | पाण्याच्या टाक्यात बुडून १४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू, राजापूर येथील घटना

प्रतिकात्मक फोटो

भंडारा : अंगणात खेळत असलेला १४ महिन्याचा बालक खेळता खेळता पाण्याच्या टाक्यात पडून मरण पावला. ही घटना तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील राजापूर येथे २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९:३० वाजताचे दरम्यान घडली. मृतक बालकाचे नाव अद्वीक अतुल शहारे (१४ महिने, रा. राजापुर), असे आहे.

मृतक बालक हा घराशेजारील स्वयंजित भैसारे यांचे घरी खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याने भरून असलेल्या टाक्याजवळ गेला. पाण्याशी खेळत असतांना तोल गेल्याने तो टाक्यात पडला. नाकातोंडात पाणी गेल्याने मुदमरून मरण पावला. घटनेची माहिती होताच मातेने हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. प्रकरणी शुभम ताराचंद शेंडे, यांचे तक्रारीवरून पोलिस ठाणे गोबरवाही येथे मर्ग नोंदविण्यात आला. तपास पोलिस उपनिरक्षक रूपशे कुंभारे करीत आहे.
 

Web Title: A 14-month-old boy died after drowning in a water tank, an incident in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.