१० हजाराची लाच स्वीकारली, अन् सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला जाळ्यात

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: August 18, 2023 04:51 PM2023-08-18T16:51:27+5:302023-08-18T16:53:46+5:30

भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

A bribe of 10,000 was accepted, and the assistant police inspector was caught in the trap of acb | १० हजाराची लाच स्वीकारली, अन् सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला जाळ्यात

१० हजाराची लाच स्वीकारली, अन् सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला जाळ्यात

googlenewsNext

भंडारा :भंडारा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश केशवराव साठवणे (४५, हनुमान वॉर्ड तकीया रोड) १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. गुरुवारी रात्री १७ ऑगस्ट रोजी ही कारवाई झाली.

या घटनेतील मुलगा आयुष डांगरे व अन्य तीन इसमाविरुद्ध भंडारा शहर पोलिस ठाणे येथे विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातून तक्रारदाराच्या मुलाचे नाव वगळून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक साठवणे याने तक्रारदार यांच्याकडे १२ ऑगस्ट रोजी १० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र ही लाच देण्याची त्यांची तयारी नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून १७ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. यात साठवणे याने १० हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. ही रक्कम स्विकारताच पथकातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

सदर प्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, डॉ.अरुणकुमार लोहार, अमित डहारे, संजय कुंजरकर, गोस्वामी, अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार,चेतन पोटे,मयूर शिंगणजुडे, विवेक रणदिवे, राजकुमार लेंडे, अंकुश गाढवे, विष्णू वरठी, राहुल, अभिलाषा गजभिये यांनी केली.

Web Title: A bribe of 10,000 was accepted, and the assistant police inspector was caught in the trap of acb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.