गोकुळाष्टमीसाठी गावी आलेल्या डॉक्टरांचा कार उलटल्याने मृत्यू तर १ जण जखमी
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 7, 2023 05:54 PM2023-09-07T17:54:13+5:302023-09-07T17:54:33+5:30
खापा -काटेबाम्हणी शेत शिवारातील घटना
भंडारा : तुमसर वरून -रामटेक मार्गे जाणारी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजता तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खापा काटेबाम्हणी शेत शिवारात घडली.
ब्रह्मा तेजराम रहांडाले (५०, मनसर) असे मृताचे नाव तर निखिल नखाते (मांजरी, मनसर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. या अपघातामध्ये कारच्या बरेच नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग रामटेक गोंदिया मार्गावर खापा काटेबाम्हणी शेत शिवारात तुमसरहुन रामटेक कडे जाणारी भरगाव वेगाने जात असलेली कार (एमएच ३१, डीके ५७८३) रस्त्याच्या कडेला पलटली. या वाहनात दोन व्यक्त होते. कारचालक ब्रह्मा रहांगडाले आणि जखमी निखील नखाते यांना गावकऱ्यांच्या सहाय्याने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच ब्रह्मा यांचा मृत्यू झाला. ते गोकुळाष्टमी निमित्त स्वगावी मिटेवाणी येथे आले होते. पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते व पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग गोमलाडू करीत आहेत.
मिटेवानीत शोककळा
व्यवसायाने डॉक्टर असलेले ब्रह्मा राहांगडले यांच्या अवकाळी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आज कान्होबाचे विसर्जन असतानाच ही दुःखद घटना घडल्यामुळे मीटेवाणी गावांमध्ये दु:खद वातावरण आहे.