गोकुळाष्टमीसाठी स्वगावी आलेल्या डॉक्टरांचा कार उलटल्याने मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 11:59 AM2023-09-08T11:59:25+5:302023-09-08T12:04:08+5:30

खापा -काटेबाह्मणी शेत-शिवारातील घटना

A doctor who had come to his hometown for Gokulashtami died in a car crash | गोकुळाष्टमीसाठी स्वगावी आलेल्या डॉक्टरांचा कार उलटल्याने मृत्यू, एक गंभीर जखमी

गोकुळाष्टमीसाठी स्वगावी आलेल्या डॉक्टरांचा कार उलटल्याने मृत्यू, एक गंभीर जखमी

googlenewsNext

खापा (भंडारा) : तुमसरवरून रामटेकमार्गे जाणारी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खापा काटेबाह्मणी शेत शिवारात घडली. 

ब्रह्मा तेजराम रहांडाले (५०, मनसर) असे मृताचे नाव, तर निखिल नखाते (मांजरी, मनसर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. या अपघातामध्ये कारच्या बरेच नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग रामटेक गोंदिया मार्गावर खापा काटेबाह्मणी शेत शिवारात तुमसरहून रामटेक कडे जाणारी भरगाव वेगाने जात असलेली कार (एमएच ३१, डीके ५७८३) रस्त्याच्या कडेला पलटली. या वाहनात दोन व्यक्त होते. कारचालक ब्रह्मा रहांगडाले आणि जखमी निखिल नखाते यांना गावकऱ्यांच्या साहाय्याने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच ब्रह्मा यांचा मृत्यू झाला.

ते गोकुळाष्टमीनिमित्त स्वगावी मिटेवाणी येथे आले होते. पुढील तपास तुमसर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गिते व पोलिस उपनिरीक्षक विजय सिंग गोमलाडू करीत आहेत.

मिटेवाणीत शोककळा

व्यवसायाने डॉक्टर असलेले ब्रह्मा राहांगडले यांच्या अवकाळी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आज कान्होबाचे विसर्जन असतानाच ही दुःखद घटना घडल्यामुळे मिटेवाणी गावांमध्ये दु:खद वातावरण आहे.

Web Title: A doctor who had come to his hometown for Gokulashtami died in a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.