भंडाऱ्यात भर बाजारातील हॉटेलला पहाटे लागली आग; शॉर्ट सर्किटचा संयश, लाखांचे नुकसान
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: May 9, 2024 11:54 AM2024-05-09T11:54:18+5:302024-05-09T11:54:28+5:30
नागरिकांनी हॉटले मालकाला कळवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले.
भंडारा : शहरातील मोठा बाजार परिसरातील बीसेन हॉटेलला शुक्रवारी पहाटे ४ वाजता आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा संशय आहे. सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान मात्र यात झाले आहे. पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिसेन हॉटलेच्या तिसऱ्या माळ्यावर आग लागली. हा प्रकार परिसरातील नागिरकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली.
नागरिकांनी हॉटले मालकाला कळवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. काही वेळानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज आलेला नाही. सुदैहवाने कसलीही प्राणहानी झाली नाही. हा परिसर मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. परिसरात लागूनच अनेक लहानमोठी दुकाने आणि नागिरकांची वसाहतही आहे. आग वाढली असती तर लगतच्या दुकानांनाही धोका होण्याची शक्यता होती.