जिल्ह्यात निधीचा ठणठणाट; मोदी आवासची ९,८२१ बांधकामे अडचणीत

By युवराज गोमास | Published: July 6, 2024 02:28 PM2024-07-06T14:28:17+5:302024-07-06T14:28:51+5:30

लाभार्थ्यांत संताप : शासनाने तातडीने निधीची उपलब्धता करण्याची मागणी

A shortage of funds in the district; 9,821 constructions of Modi Awas in trouble | जिल्ह्यात निधीचा ठणठणाट; मोदी आवासची ९,८२१ बांधकामे अडचणीत

A shortage of funds in the district; 9,821 constructions of Modi Awas in trouble

युवराज गोमासे

भंडारा : जिल्ह्यात मोदी आवास योजनेंतर्गत ११,१०५ घरकुलांना लक्ष्यांक देण्यात आला. त्यापैकी शासन-प्रशासनाच्या वतीने यंदा ११,०३३ घरकुलांना मजुरी देण्यात आली. ३ जुलैपर्यंत या योजनेतील १२१२ घरकुल पूर्ण झाले आहेत, तर ९८२१ घरकुलांचे बांधकाम अद्यापही विविध टप्प्यावर आहेत; परंतु दोन महिन्यांपासून जिल्ह्यात मोदी आवास योजनेत निधीचा ठणठणाट आहे. परिणामी, हप्ते प्राप्त होण्यास विलंब होत असून बांधकामे अडचणीत सापडली आहेत.

राज्यातील ओबीसी प्रवर्गातील बेघर, कच्ची घरे व गरजवंत असलेल्यांना हक्काचा घरकुल मिळावे, या हेतूने राज्य शासनाने सन २०२४ मध्ये मोदी आवास योजनेची सुरुवात केली. ओबीसी प्रवर्गातील बेघर, कच्ची घरे असलेल्यांना हक्काचा घरकुल मिळावे, या हेतूने राज्य शासनाने सन २०२४ मध्ये मोदी आवास योजनेची सुरुवात केली. या योजनेत ओबीसीतील वंचित घटकांचा तसेच प्रलंबित 'ड' यादीतील घरकुल लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना अन्य योजनांप्रमाणे दीड लाखाचा निधी दिला जातो. सुमारे चार टप्प्यांत हा निधी प्रशासनाकडून वितरित केला जातो.


१,२१२ घरकुलांची बांधकामे पूर्ण

जिल्ह्यात मोदी आवास योजनेंतर्गत ११,०३३ घरकुलांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत १,२१२ घरकुलांचे बांधकाम लाभार्थ्यांनी पूर्ण केले आहे. उर्वरित बांधकामे विविध टप्प्यांत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. पूर्ण झालेली तालुकानिहाय बांधकामे याप्रमाणे. भंडारा १७३, लाखांदूर १६, लाखनी १७६, मोहाडी २००, पवनी १७७, साकोली १३२, तुमसर ३३८, एकूण १,२१२.
 

सद्य:स्थितीत टप्पानिहाय बांधकामे
तालुका           पहिला           दुसरा            तिसरा           चौथा

भंडारा               १४२८          ७१२              ३५९             १४
लाखांदूर            ११७५          ७१०             ३२६              ००

लाखनी              १४४९         ७६४             ४०१              २७
मोहाडी              २००९          ९५०            ४७०              २०

पवनी                 १४३७          ७५१            ४१७              १९
साकोली             १०५३          ६१०             ३६८              ००

तुमसर               २३७७          १२६७         ७४१              ७९
एकूण                १०९२८         ५७६४        ३०८२            १५९


घरकुल लाभार्थी म्हणतात...

मोदी आवास योजनेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले घरकुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. आतापर्यंत पहिला टप्पा मिळाला. दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम निधीअभावी थांबले आहे.
- निर्मला कमाने, घरकुल लाभार्थी.

मोदी आवास योजनेमुळे माझे घरकुल पूर्ण झाले; परंतु शेवटचा टप्पा मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने निधी पुरवठ्याकडे लक्ष द्यावे. महागाई लक्षात घेता घरकुलाचा निधी वाढवून द्यावा.
- विष्णू हलमारे, घरकुल लाभार्थी.

Web Title: A shortage of funds in the district; 9,821 constructions of Modi Awas in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.