औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात सुपरवायझर भाजला; कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: November 13, 2023 05:29 PM2023-11-13T17:29:19+5:302023-11-13T17:30:31+5:30
देव्हाडी येथील कंपनीतील प्रकार
भंडारा : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील शिवारात क्लेरीयन ड्रग कंपनी या औषध निर्मिती कारखान्यात कर्तव्यावर असलेला सुपरवायझर भाजला. सदर घटना सोमवारी सकाळी ७:०० वाजता घडली. कंपनी प्रशासनाने त्याला तात्काळ भंडारा येथे एका खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले. भाजलेल्या सुपरवायझरचे नाव परशुराम बोंद्रे (४५, विहीरगाव) असे आहे.
क्लेरीयन ड्रग कंपनी या औषध निर्मिती कारखान्यात परशुराम बोंद्रे हे सुपरवायझर या पदावर कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी ते भाजण्याचा प्रकार घडला. त्यांच्या हातावर व शरीरावर रसायनयुक्त उष्ण पाणी पडल्याची घटना घडली. त्यामुळे कंपनीत एकच खळबळ माजली. त्यांना तात्काळ भंडारा येथे कंपनीच्या वाहनातून नेण्यात आले. मात्र तुमसर पोलिस ठाण्यात याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.