रानडुकराचा शाळेत तब्बल सात तास धुडगूस; बघ्यांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:25 PM2023-02-03T15:25:49+5:302023-02-03T15:28:30+5:30

चुल्हाडची घटना : वनविभागाने केले जेरबंद

A wild boar roared in the school for seven hours in bhandara | रानडुकराचा शाळेत तब्बल सात तास धुडगूस; बघ्यांची मोठी गर्दी

रानडुकराचा शाळेत तब्बल सात तास धुडगूस; बघ्यांची मोठी गर्दी

googlenewsNext

भंडारा : जंगलातून भटकलेले एक रानडुक्कर थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरण्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे घडली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर या रानडुकराला वनविभागाने जेरबंद केले. रानडुकराला पाहण्यासाठी शाळेसमोर मोठी गर्दी झाली होती.

चुल्हाड येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू होते. दरम्यान गुरुवारी सकाळी ७ वाजता मोठे रानडुक्कर थेट शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरले. सुदैवाने यावेळी शाळेत विद्यार्थी नव्हते. रानडुक्कर शाळेत शिरल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली.

वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कार्यालय आणि सिहोरा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या रानडुकराला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. रानडुक्कर शाळेत इकडतिकडे पळत होते. सात तासांच्या प्रयत्नानंतर या रानडुकराला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात बपेराचे डेडीड मेश्राम, काहुलकर, सेलोकर, वासनिक, शेख यांनी केली.

रानडुक्कर जखमी

जंगलातून भटकलेले रानडुक्कर शाळेत शिरल्यानंतर वनविभागाने जेरबंद केले. मात्र रानडुक्कर जखमी असल्याचे लक्षात आले. रानडुकराला जेरबंद केल्यानंतर बपेरा येथील पशुचिकित्सालयात नेऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर सोंड्याटोला जंगलात सोडून देण्यात आले.

मोठा अनर्थ टळला

रानडुक्कर शाळेत शिरले त्यावेळी शाळेत एकही विद्यार्थी नव्हता. मात्र शाळा सुरू असताना रानडुक्कर शिरले असते तर मोठा अनर्थ झाला असता. सुदैवाने सकाळी ७ वाजता कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: A wild boar roared in the school for seven hours in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.