शेततलावातील पाण्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 03:15 PM2023-07-08T15:15:57+5:302023-07-08T15:30:05+5:30

तलावाच्या पाळीवरून घसरला पाय : अंतरगाव शेतशिवारातील घटना

A young farmer died after drowning in the farm pond | शेततलावातील पाण्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

शेततलावातील पाण्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर 

भंडारा : नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपल्या शेताची पाहणी करावयास गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा शेततलावाच्या पाळीवरून पाय घसरून तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना ८ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव शेत शिवारात घडली. भेरुदास सुखदेव गोटेफोडे (४४, लाखांदूर) असे घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिस सूत्रानुसार, भेरुदास यांची अंतरगाव शेत शिवारात मालकी शेतजमीन आहे. ते नेहमी शेतावर जात असे. घटनेच्या दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भेरुदास नेहमीप्रमाणे मालकी शेतावर गेले होते. उशीर होऊही भेरुदास घरी न परतल्याने त्यांचा लहान भाऊ सुरेश त्यांना शोधण्यासाठी शेतशिवारात गेला. जवळपास १० वाजताच्या सुमारास सुरेश शेत शिवारात गेला असता भेरुदासने शेतात नेलेली मोटार सायकल रस्त्याच्या कडेला दिसली मात्र भेरुदास दिसून आला नाही. सुरेश घराकडे परत गेला.

पुन्हा दुसऱ्या मार्गाने शेतशिवाराकडे गेला असता शेतातील शेततलावाच्या पाळीवर एक चप्पल दिसली दुसरी चप्पल शेततळ्यात तरंगताना दिसली. सुरेशने नजीकच्या शेतशिवारात असलेल्या अन्य नागरिकांना आवाज दिला. नजीकाच्या नागरिकांनी शेततळ्यावर येत मच्छीमार बांधवांना पाचारण करून शेततळ्यातील पाण्यात शोध घेतला असता पाण्यात तळाशी भेरुदास यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस नायक सुभाष शहारे, सतिश सिंगनजुडे, संदिप बावनकुळे, पोलीस अंमलदार अनिल राठोड यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार गोपाल कोसरे करीत आहेत.

Web Title: A young farmer died after drowning in the farm pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.