अंगणवाडीतच निघणार चिमुकल्यांचे आधारकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:33 PM2018-06-15T22:33:26+5:302018-06-15T22:33:37+5:30
अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आधार कार्ड यानंतर अंगणवाडीतच काढणे व त्या चिमुकल्या विदयार्थ्यांची व लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने पुढाकार घेण्यात आ लेला असून याकरिता भंडारा जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आधार कार्ड यानंतर अंगणवाडीतच काढणे व त्या चिमुकल्या विदयार्थ्यांची व लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने पुढाकार घेण्यात आ लेला असून याकरिता भंडारा जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबचे वितरण करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात टॅब वितरणाचा छोटेखानी कार्यक्रम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेकांद कुझेर्कार, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मंजूषा ठवकर, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती मनिषा कुरसंगे व जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांची उपस्थिती होती.
भंडारा जिल्हयात अंगणवाडी व मिनी अंगणवाडींची संख्या १३०५ असून याकरिता जिल्हात सातही एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ४२ अंगणवाडी पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे माध्यमातून एकात्मीक बाल विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडी व मिनी अंगणवाडी मधील कामाचे व माहितीचे सनियंत्रण केल्या जाते.
अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे कार्य डिजिटल व अधिक गतीमान व्हावे, अंगणवाडीमधील चिमुकल्यांची माहिती अदयावत राहावी व अंगणवाडीतील सर्व लाभार्थ्यांची माहिती आॅनलाईन नोंदणी करण्याच्या उदेश्याने टॅब व थंब मशीनचे वितरण करण्यात आले. यामध्ये लाईन लिस्टींग सॉफटवेअरच्या माध्यमातून माहितीचे आॅनलाईन संकलन करणे अगदी सूलभ होणार आहे.
यापूढे रेकार्डवर लिहाव्या लागणाऱ्या माहितीचा त्रास वाचणार आहे. माहिती आॅनलाईन केल्यानंतर एका क्लीक वर संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे अद्ययावत माहितीचे संकलन करता येणार आहे. तसेच जन्माला आलेल्या बाळापासून तर ज्येष्ठापर्यंत आधारकार्ड हे सर्वांनाचा आवश्यक आहे. त्यामुळे अंगणवाडीत चिमुकल्या विदयार्थ्यांना आधारकार्ड काढता यावे याकरिता टॅबच्या सहायाने आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
यापूर्वी अंगणवाडीस्तरावर ही सुविधा नसल्याने पालकांना इतरत्र पायपीट करावी लागत होती. पालकांना हा होणारा त्रास लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेऊन आधार कार्ड अंगणवाडीतच काढण्यासाठी टॅब व थंब मशिनचे वितरण करण्याचा महत्वपूर्ण राज्याच्या महिला व बालविकास विभागाने निर्णय घेतला. या सुविधेमुळे अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून बालकांची आधार नोंदणी निु:शुल्क करण्यात येणार आहे.
गुरूवारला पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षकांना टॅब व थंब मशिनचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकांद कुर्झेकार, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मंजुषा ठवकर, महिला व बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे यांची उपस्थिती होती.