शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:08 AM2019-06-20T01:08:51+5:302019-06-20T01:09:21+5:30

शालेय पोषण आहार कर्मचाºयांना १८ हजार रुपये वेतन व पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद करू नये आदी शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांना घेऊन सोमवारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे जिल्हासचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Aakrosh Morcha on Zilla Parishad of the school nutrition workers | शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता होणार : शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये वेतन व पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद करू नये आदी शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांना घेऊन सोमवारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे जिल्हासचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शासनस्तरावरील मागण्यात कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय मागे घ्या, कर्मचाºयांना १८ हजार रुपये किमान वेतन द्या व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचे नियम लागू करा, वर्षभरात १२ महिन्यांचे वेतन, मानधन दर महिन्याला द्या तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त कामे घेण्यात येऊ नये, स्टॅम्पपेपरवर करारनामा लिहून घेणे बंद करा, नवीन सत्रात कर्मचारी बदलने बंद करा, शासन निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई करा, कामाच्या वेळा ठरवून देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे आदी १४ मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी आले. शिष्टमंडळात भंडारा जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा आयटकचे सचिव हिवराज उके, राजू बडोले, भाग्यश्री उरकुडे, सुनिता मडावी, लता कुडेगावे, महानंदा नखाते, रिना राऊत, विद्या बोंदरे, प्रतिमा कान्हेकर, वंदना पेशने आदींचा समावेश होता.
दरम्यान राज्यस्तरावरच्या मागण्यासाठी दि. २१ जूनला मुंबई मंत्रालयावर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने महिला व पुरूष सहभागी झाले होते.

Web Title: Aakrosh Morcha on Zilla Parishad of the school nutrition workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा