आष्टी लोभी तलावात वाघाचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:04 PM2018-05-15T23:04:09+5:302018-05-15T23:04:09+5:30
आष्टी लोभी शिवारातील खाम तलाव शिवारात पट्टेदार वाघ दिसल्याने एकच खळबळ माजली. मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांना तलावाजवळ भटकंती करताना तो दिसला. शेतकऱ्यांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची माहिती नाकाडोंगरी वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वाघावर लक्ष ठेवण्याकरिता नाकाडोंगरी, तुमसर तथा भंडारा येथून रेस्क्यू आॅपरेशन पथक घटनास्थळी दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आष्टी लोभी शिवारातील खाम तलाव शिवारात पट्टेदार वाघ दिसल्याने एकच खळबळ माजली. मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांना तलावाजवळ भटकंती करताना तो दिसला. शेतकऱ्यांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची माहिती नाकाडोंगरी वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वाघावर लक्ष ठेवण्याकरिता नाकाडोंगरी, तुमसर तथा भंडारा येथून रेस्क्यू आॅपरेशन पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत वाघ तलाव परिसरातच वावरतांना दिसला.
तुमसर तालुक्यातील आष्टी लोभी रस्त्याशेजारी खाम तलाव आहे. तलाव क्षेत्रात पट्टेदार (वयस्क) वाघ गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांना दिसला. त्यानंतर एकच खळबळ माजली. शेतकºयांनी शेतीचे कामे सोडून घरी परत आले. ही माहिती नाकाडोंगरी येथील वनपरिक्षेत्राधिकारी हितेश धनविजय यांना देण्यात आली. दरम्यान धनविजय यांनी भंडारा येथील मुख्य कार्यालयात दिली. तुमसर, भंडारा येथून वनअधिकारी व कर्मचाºयांचे पथक नाकाडोंगरी येथे दाखल झाले.
तलाव परिसरात तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी, भंडाºयाच्या अधिकारी राऊत, नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हितेश धनविजय इतर कर्मचारी, पोलीस कर्मचारी सकाळी दाखल झाले. तलाव परिसरात पट्टेदार वाघ त्यांना दिसला. मध्यप्रदेशातून तो महाराष्ट्रात दाखल झाला. बावनथडी नदी ओलांडून तो आष्टी तलाव परिसरात दाखल झाल्याने वनपरिक्षेत्रअधिकारी धनविजय यांनी लोकमतला सांगितले. तसा वाघाचा हा कोरीडोर आहे.
पट्टेदार वाघ मध्यप्रदेशातून आष्टी, लोभी तलाव परिसरात दाखल झाला आहे. तो जखमी नसल्याने त्याला पकडण्याचे आदेश नाहीत. आम्ही सध्या लोकेशन घेत आहोत. वरिष्ठांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल.
- हितेश धनविजय
वनपरिक्षेत्राधिकारी नाकाडोंगरी
तलाव परिसरात वाघाचा दहा तासापासून ठिय्या आहेत. वनअधिकाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावणे गरजेचे आहैे. पुन्हा पाण्याच्या शोधात वाघ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघाच्या भीतीने शेतकरी दिवसभर शेताकडे फिरले नाही.
- शिशुपाल गौपाले,
पं.स. सदस्य आष्टी