अबब! आरटीईच्या ७९१ जागांसाठी १७६३ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:37+5:302021-03-23T04:37:37+5:30

भंडारा : राईट टू एज्युकेशन अंतर्गत जिल्ह्यातील ९४ शाळांमधील २५ टक्के जागा २०२१-२२ या वर्षांकरिता भरावयाच्या आहेत. यात ...

Abb! 1763 applications for 791 RTE seats | अबब! आरटीईच्या ७९१ जागांसाठी १७६३ अर्ज

अबब! आरटीईच्या ७९१ जागांसाठी १७६३ अर्ज

Next

भंडारा : राईट टू एज्युकेशन अंतर्गत जिल्ह्यातील ९४ शाळांमधील २५ टक्के जागा २०२१-२२ या वर्षांकरिता भरावयाच्या आहेत. यात आतापर्यंत ७९१ जागांसाठी १,७६३ अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढविण्यात आली असून, ती ३० मार्च करण्यात आली आहे. यामुळे याचा फायदा अर्ज दाखल करण्यासाठी पालकांना होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात आरटीई अंतर्गत एकूण ९४ शाळा आहेत. यात भंडारा तालुक्यात २७, लाखांदूर तालुक्यात ४, लाखनी ९, मोहाडी १६, पवनी १२, साकोली १० तर तुमसर तालुक्यातील १६ शाळांचा समावेश आहे. तालुकानिहाय अर्ज दाखल केल्याप्रमाणे २१ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून २,०१९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,७६३ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. उर्वरित २५६ अर्ज ‘कन्फर्म’ झालेले नाहीत. तालुकानिहाय आकडेवारीवर नजर घातल्यास भंडारा तालुक्यात ६४९, लाखांदूर २३, लाखनी १३४, मोहाडी २३७, पवनी १६०, साकोली १६१, तुमसर ३९९ येथे अर्ज दाखल झाले आहेत.

बॉक्स

आठ दिवस करता येणार नोंदणी

आरटीई अंतर्गत राज्यभरात ऑनलाइन नोंदणीची तारीख यापूर्वी २१ मार्च होती; मात्र ही मुदत वाढवून ३० मार्च करण्यात आली आहे. आता पालकांना आपल्या पाल्याची आरटीई अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आठ दिवसांचा अधिक वेळ मिळाला आहे. अर्ज सादर करताना एका विद्यार्थ्यासाठी एकच अर्ज सादर करावयाचा असतो. अधिक अर्ज सादर केल्यास पाल्याचा प्रवेश रद्द केला जातो. तसेच गूगल ॲपच्या साह्याने घराचा पत्ता अचूक नोंदणीही आवश्यक असते. तसेच ऑनलाइनबाबत काही अडचणी उद्भवल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Abb! 1763 applications for 791 RTE seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.