‘युनिव्हर्सल’ कारखान्याला अभय कुणाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:48 PM2018-09-05T22:48:07+5:302018-09-05T22:48:27+5:30

तुमसर जवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना कारखानदाराने मुदत संपल्यानंतरही सुरु केला नाही. महावितरण वीज मंडळाने कारखान्याविरुद्ध खटला दाखल केला. १७ महिने लोटले तरी कारखान्याविरुद्ध ठोस कारवाई राज्य शासनाने केली नाही. मागील तीन वर्षात कारखानदाराने सुमारे २०० कोटीची मॅग्नीज विक्री केली.

Abhay, who is the 'Universal' factory! | ‘युनिव्हर्सल’ कारखान्याला अभय कुणाचे!

‘युनिव्हर्सल’ कारखान्याला अभय कुणाचे!

Next
ठळक मुद्देअभय योजनेअंतर्गत कराराचा भंग : वीज वितरण कंपनीचा कारखान्याविरुद्ध खटला, मॅग्नीज विक्री सुरुच

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर जवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना कारखानदाराने मुदत संपल्यानंतरही सुरु केला नाही. महावितरण वीज मंडळाने कारखान्याविरुद्ध खटला दाखल केला. १७ महिने लोटले तरी कारखान्याविरुद्ध ठोस कारवाई राज्य शासनाने केली नाही. मागील तीन वर्षात कारखानदाराने सुमारे २०० कोटीची मॅग्नीज विक्री केली. आजही कारखाना परिसरातून दररोज मॅग्नीज विक्रीकरिता जाणे सुरुच आहे. अभय योजनेअंतर्गत कारखान्याला अभय मिळाले. सध्या येथे शासनाचे अभय मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
तुमसर जवळ माडगी (दे) येथे युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना आहे. मागील १२ वर्षापासून कारखाना बंद आहे. सन २०१४ मध्ये कारखानदाराने ४८ कोटी वीज बिलापोटी भरले. शासनाने अभय योजनेअंतर्गत सदर कारखान्यावरील सुमारे १५० कोटी माफ केले होते. परंतु तीन वर्षात कारखाना सुरु करण्याची अट राज्य शासनाने घालून दिली होती. ३१ मार्च २०१७ पर्यंत कारखाना सुरु करण्याची मर्यादा होती. परंतु कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही.
दि. १४ एप्रिल २०१७ ला महावितरण कंपनीने कारखान्याविरोधात खटला दाखल केला. १७ महिन्यांचा काळ लोटला. परंतु राज्य शासनाने करारनाम्याचा भंग केल्याप्रकरणी ठोस कारवाई केली नाही. दरम्यान सन २०१४ पासून कारखाना परिसरातील मॅग्नीज विक्री करण्यात आली. मॅग्नीज विक्रीतून सुमारे २०० कोटींचा मॅग्नीज आजपावेतो कारखानदाराने विक्री केला. आजही मॅग्नीज विक्री करणे सुरुच आहे. सदर कारखान्यात २७८ कामगार कार्यरत होते. त्यापैकी बऱ्याच कामगदारांनी ले आॅफ घेतले. त्या कामगारांनीही कारखाना सुरु करण्याच्या अटीवर ले आॅफ घेतला होता. येथील १२ कर्मचाºयांचा सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. कामगार सुमारे १२ वर्षापासून बेरोजगार आहेत. परंतु काही कामगारांना वार्षीक आठ लक्षाचे उत्पन्न दाखविण्यात आल्याने त्या कामगारांना आयकर विभागाच्या नोटीस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कामगारांत येथे असंतोष दिसत आहे. कारखान्याकडे ३०१ एकर शेती पडून आहे. कसदार शेती येथे ओसाड पडली आहे. कारखानदाराने कामगार व अधिकाºयांच्या मुलाकरिता इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली होती. ती आजही येथे सुरु आहे. कारखाना बंद झाल्याने कामगार नाहीत. परंतु शाळा मात्र नियमित सुरु आहे. उलट रुग्णालय येथे कायम बंद करण्यात आले हे विशेष. आयकर नोटीस प्राप्त झाल्याने कामगारात खळबळ माजली असून त्याविरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी कामगारांनी सुरु केली आहे. येथील सर्व प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने सुरु करण्याची गरज आहे. कारखान्यातून मॅग्नीज विक्री राज्य शासनाने रोखण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे.

कारखान्याने कराराचा भंग केला. राज्य शासनाने येथे गंभीर दखल घ्यावी. मॅग्नीज विक्री करणे त्वरीत थांबवावे. कारखानदाराला जाब विचारावा. शेतकºयांच्या जमिनी परत करावे. राज्य शासनाने सदर कारखाना स्वत: चालवावा अथवा त्याचा लिलाव करण्यात यावा.
-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.

Web Title: Abhay, who is the 'Universal' factory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.