कोरोनाच्या संकटातही तुमसरमध्ये टरबूजाचे भरघोस उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:01+5:30
सध्या भाजीपाला फळांचे उत्पादन करण्याचा हा काळ आहे. योग्य खबरदारी घेऊन शेतकरी पिकांची जोपासना करीत आहे. तुमसर शहरापासून तीन किमी अंतरावरील डोंगरला शिवारात राऊत कुटुंबिय आपल्या फळबागांची जोपासना करीत आहे. शेतावर आकस्मिक आ.राजू कारेमोरे यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. डोंगरला येथे गोविंद राऊत, शंकर राऊत यांची आठ ते नऊ एकर शेती आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोनामुळे सर्व लॉकडाऊन आहे. परंतु शेतकरी या संकटातही शेतातील पिकांची योग्य काळजी घेत आहे. उन्हाळा सुरु झाल्याने सर्वच पिकांना पाण्याची सोय करावी लागत आहे.
सध्या भाजीपाला फळांचे उत्पादन करण्याचा हा काळ आहे. योग्य खबरदारी घेऊन शेतकरी पिकांची जोपासना करीत आहे. तुमसर शहरापासून तीन किमी अंतरावरील डोंगरला शिवारात राऊत कुटुंबिय आपल्या फळबागांची जोपासना करीत आहे. शेतावर आकस्मिक आ.राजू कारेमोरे यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. डोंगरला येथे गोविंद राऊत, शंकर राऊत यांची आठ ते नऊ एकर शेती आहे. शेतात त्यांनी टरबूज व तीन ते चार एकरात केळींची फळबाग लागवड केली आहे. तुमसर तालुका भात उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. दर्जेदार व गुणात्मक धानाची लागवड येथे करण्यात येते. परंतु परंपरागत पिकांसोबतच फळबाग लागवड करण्याचा निश्चय राऊत कुटुंबियांनी केला. याकरिता टरबूज व केळीचे उत्पादन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याकरिता संबंधित फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपासून त्यांनी माहिती घेतली. प्रत्यक्ष त्या फळबागांना भेटी त्यांनी दिल्या.तीन एकरात केळीची फळबागदर्जेदार केळी पिकांचे बीज आणून त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली. तीन एकरात केळींची झाडे येथे बहरली आहेत. उर्वरीत शेतात टरबूज लागवड करण्यात आली.
एका टरबूजाचे सुमारे १३ ग्राम इतके आहे. त्या टरबूजाला महाबली टरबूज असे नाव देण्यात आले. दिसायला महाकाय व वजनदार व तितकाच गोड रुचकर असा हा टरबूज आहे. नगदी पीक म्हणून युवकांनी फळबाग शेतीकडे वळण्याचे शेतकरी शंकर राऊत यांनी सांगितले. आमदार राजू कारेमोरे यांनी दिली भेट शुक्रवारी आमदार राजू कारेमोरे तालुक्यात संपर्काला जाताना त्यांनी शेतकरी गोविंद राऊत यांच्या शेतीा भेट दिली. यात टरबूज व केळीच्या पिकांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. शासकीय मदतीची गरज असल्यास तसे सांगावे असे आ.कारेमोरे यांनी राऊत कुटुंबियाला सांगितले. त्याच्यासोबत यावेळी देवचंद ठाकरे, रामदयाल पारधी, दिलीप बघेले, हरिश्चंद्र पटले, बनकर इत्यादी उपस्थित होते.