तलावात मुबलक पाणीसाठा, वितरिकांची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:45 AM2021-02-25T04:45:54+5:302021-02-25T04:45:54+5:30
तुमसर तालुक्यातील गुडरी येथे रोजगार हमी योजनेंतर्गत शेती सिंचनाकरिता तलाव निर्माण करण्यात आले. १९८० मध्ये वितरिकांचे जाळे परिसरात निर्माण ...
तुमसर तालुक्यातील गुडरी येथे रोजगार हमी योजनेंतर्गत शेती सिंचनाकरिता तलाव निर्माण करण्यात आले. १९८० मध्ये वितरिकांचे जाळे परिसरात निर्माण करण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु त्याच वर्षी केंद्रीय वन कायदा तयार झाला. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असल्याने झुडपी जंगल या परिसर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वितरिकेंच्या कामांना येथे ब्रेक लागला. सध्या तलावांमध्ये मोठा जलसाठा उपलब्ध आहे वितरिका नसल्याने तलावातील पाणी शेती सिंचनाकरिता पोहचू शकत नाही.
भंडारा जिल्हा नियोजन समितीत या विषयावर चर्चा केली जात नाही. गुडरी गावात ९० टक्के आदिवासी शेतकरी आहेत. शासन आदिवासींच्या प्रगतीच्या अनेक योजना राबविते परंतु वन कायद्यातून अजूनपर्यंत या वितरिकांची सुटका झाली नाही. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांना दुष्काळाचा सामना करावा लागतो आर्थिक स्थिती दिवसेंदिवस त्यांची खराब होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्ष केल्या जात आहे.
तालुक्यातील अशा अनेक ज्वलंत समस्या तहसील स्तरावर तालुका नियोजन समितीने तयार करण्याची गरज आहे तालुकास्तरावर नियोजन समिती असल्यास समस्यांना येथे निराकरण होण्याची शक्यता अधिक आहे. लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.